भारत आणि वेस्ट इंडीज (WI vs IND) हे जगातील दोन मोठे संघ म्हणून गणले जातात. जेव्हा जेव्हा हे दोन संघ टी-२० फॉरमॅटमध्ये आमनेसामने येतात तेव्हा रोमहर्षक सामने पाहायला मिळतात. भारताने अलीकडेच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजचा ४-१ अशा फरकाने पराभव करून मालिका जिंकली. दोन्ही संघांमधील टी-२० सामन्यांचे रेकॉर्ड पाहता भारतीय संघाने नेहमीच विंडीज संघावर वर्चस्व गाजवले आहे.
या दोन्ही संघांमध्ये एकूण २५ टी-२० सामने खेळले गेले असून भारताने १७ सामने जिंकले आहेत तर वेस्ट इंडिज संघ ७ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. एका सामन्याचा निकाल लागला नाही. या लेखात आपण ३ टी-२० सामन्यांबद्दल बोलणार आहोत ज्यात वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध सर्वात कमी धावा केल्या आहेत.
१. १०० धावा (लॉडरहिल, २०२२)
अलीकडेच भारताने वेस्ट इंडिजचा दौरा केला जेथे दोन्ही देशांदरम्यान पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. मालिकेतील अंतिम सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या विंडीज संघाच्या फलंदाजांची खराब कामगिरी झाली. संघातील अनेक फलंदाजांना खातेही उघडता आले नाही आणि संपूर्ण संघ १५.४ षटकांत १०० धावांत गारद झाला. भारताने हा सामना ८८ धावांनी जिंकला.
२. ९८ धावा (लॉडरहिल, २०१९)
ऑगस्ट २०१९ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने २२ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम खेळताना, रोहित शर्माच्या (६७) शानदार खेळीमुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकांत १६७/५ अशी धावसंख्या उभारली. सामन्याच्या दुसऱ्या डावात पावसाच्या व्यत्ययामुळे वेस्ट इंडिजला डकवर्थ लुईस नियमानुसार १५.३ षटकांत १२१ धावांचे लक्ष्य गाठता आले. मात्र ५.३१ षटके खेळून विंडीज संघाला ४ गडी गमावून केवळ ९८ धावा करता आल्या.
३. ९५ धावा (लॉडरहिल, २०१९)
भारताविरुद्धच्या टी-२० मध्ये वेस्ट इंडिजची सर्वात कमी धावसंख्या ९५ आहे, जी त्यांनी ३ ऑगस्ट २०१९ रोजी लॉडरहिल खेळताना केली होती. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाने निर्धारित २० षटकात ९ गडी गमावून ९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हे लक्ष्य भारतीय संघाने १७.२ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Breaking: दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यमसने केलली निवृत्तीची घोषणा!
इन्ज्यूरी, कोरोना अन् पुनरागमन! केएल राहुल तब्बल ९ महिन्यानंतर दिसणार मैदानावर