Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्यांदा भारतीय फलंदाज अपयशी, चारही वेळी डावखुऱ्या फिरकीपटूंनी मारली बाजी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्यांदा भारतीय फलंदाज अपयशी, चारही वेळी डावखुऱ्या फिरकीपटूंनी मारली बाजी

March 1, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Australia Test team

Photo Courtesy: bcci.tv


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे जड दिसत आहे. 1 मार्च (बुधवार) रोजी इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना सुरू झाला. नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाज या सामन्यातील पहिल्या डावात पूर्णपणे अपयशी ठरले. परिणामी भारतीय संघाने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथी सर्वात कमी धावसंख्या साकारली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील यावर्षीची कसोटी मालिका भारतात आयोजित केल्यानंतर खेळप्टीवर ऑस्ट्रेलियकडून टीका सुरू झाली. मालिकेतील पहिल्या आणि दुसर्या कसोटी सामन्यात केळपटीटी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. भारताने नागपून याठिकाणी खेळलेल्या पहिल्या कसोटीत एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला गेला असून भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. उभय संघांतील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. पण यावेळी ही खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनाच महागात पडली. पहिल्या डावात अवग्या 109 धावा करून भारताने सर्व विकेट्स गमावल्या.

मायदेशातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने बुधवारी चौथी सर्वात छोटी धावसंख्या केली. मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये भारताने 2004 साली ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध सर्वात निराशाजनक कामगिरी केली होती. मुंबईत खेळलेल्या एका सामन्यात भारताने अवघ्या 104 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या, जी आजपर्यंत संघाची मायदेशातील सर्वात छोटी कसोटी धावसंख्या आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर 2017 साली खेळली केलीली पुणे कसोटी आहे. पुण्यातील या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 105 धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता. यादीत तिसऱ्या क्रमांकवर देखील 2017 सालची पुणे कसोटीच आहे, जेव्हा भारतीय संघ 107 धावांवर सर्वबाद झाला होता. बुधवारी इंदोर कसोटीत भारताचे प्रदर्शन या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताने या सामन्यातील पहिल्या डावात अवघ्या 109 धावांवर गुडघे टेकले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात भारताने केलेली सर्वात कमी धावसंख्या (कसोटी)
104 – मुंबई कसोटी, 2004
105 – पुणे कसोटी, 2017
107 – पुणे कसोटी, 2017
109 – इंदोर कसोटी, 2023

या चारही कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या यशामागे त्यांचे डावखुरे फिरकी गोलंदाज होते. या चार कसोटी सामन्यांमध्ये मायकल क्लार्क (Michael Clarke), स्टीव्ह ओ’कीफे (Steve O’Keefe), स्टीव्ह ओ’कीफे आणि मॅथ्यू कुह्नेमन यायंनी पाच विकेट्सचा हॉल नावावर केला होता. विशेष म्हणजे या गोलंदाजांच्या कसोटी कारकिर्दीतील हा पहिला पाच विकेट्स हॉल होता.  (Lowest total by India against Australia in home Tests)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रविंद्र जडेजाने रचला इतिहास! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कपिल देवनंतर फक्त जड्डूचेच नाव घेतले जाणार
जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज

 


Next Post
Rishabh-Pant

ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणाऱ्या पंतची अपघाताच्या 2 महिन्यांनंतर मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाला वाचाच

Photo Courtesy: Twitter/BCCI

इंदोर कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांची आघाडी! ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंविरूद्ध टीम इंडियाचे लोटांगण, ख्वाजाचे अर्धशतक

Virat-Kohli

इकडं टीम इंडिया अडचणीत, तिकडं विराटने मैदानातच लावले ठुमके; डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143