---Advertisement---

विराटला सतावतोय ऑस्ट्रेलियाचा ‘स्कॉलर’! तिन्ही सामन्यात कोहली झालाय ढेर

On: बुधवार, मार्च 1, 2023 4:01 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंदोरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना खेळला जात असून, भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात केवळ दीड सत्र फलंदाजी करू शकला. त्याचवेळी भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली हा पुन्हा एकदा आपला तिसरा सामना खेळत असलेल्या टॉड मर्फी याच्या गोलंदाजीवर बाद होऊन तंबूत परतला.

इंदोर कसोटीत भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरल्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. सर्वच प्रमुख फलंदाज एकापाठोपाठ बाद होत असताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने संघर्ष केला. मात्र, पहिला सत्राच्या अखेरीस त्याला युवा ऑफस्पिनर टॉड मर्फी याने पायचित पकडले. त्याने 52 चेंडूंचा सामना करताना सर्वाधिक 22 धावा काढल्या.

 

मर्फी याने याच मालिकेतील पहिल्या सामन्यावेळी नागपूर कसोटीत पदार्पण केले होते. त्याने आपले पदार्पण संस्मरणीय करताना पहिल्या डावात सात बळी टिपण्याची कामगिरी केली होती. त्यापैकी एक बळी हा विराट कोहली याचा होता. त्यानंतर दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या डावातही विराट मर्फी याचाच शिकार ठरलेला.

आतापर्यंत मालिकेत विराट विरुद्ध मर्फी असे द्वंद्व पाहायला मिळाले आहे. विराटने मर्फीच्या 83 चेंडूंचा सामना करताना केवळ 39 धावा केल्या असून, विराट तीन वेळा बाद झाला आहे. यादरम्यान त्याची सरासरी केवळ 13 इतकी राहिली. विराट अनुभवाच्या बाबतीत मर्फीपेक्षा 103 कसोटी सामने जास्त खेळला आहे. असे असताना देखील तो सातत्याने त्याच्याविरुद्ध गडबडताना दिसतोय. एकूणच मालिकेत आतापर्यंत विराट एकही अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला नाही.

(Virat Kohli Becomes Tod Murphy Bunny In Border-Gavaskar Trophy 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेम्स अँडरसनची बादशाहत अश्विनकडून उद्ध्वस्त! बनला नंबर 1 कसोटी गोलंदाज
भारतात येऊन भारताविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा मॅथ्यू दुसराच ऑस्ट्रेलियन, 2004मध्ये घडलेला विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---