पुणे : येथे सुरु असलेल्या टाटा ऑटोकॉम्प लॉयला कप आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी मिलेनियम नॅशनल प्रशाला संघाने जे.एन. पेटिट प्रशालेची आगेकूच रोखली. स्पर्धेत आजच्या दिवशी हॅचिंग्ज प्रशालेने शौर्य परदेशीने नोंदवलेल्या पाच गोलच्या जोरावर ब्लू रीज पब्लिक प्रशाला संघाचा दणदणीत पराभव केला.
लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत मिलेनियम नॅशनल प्रशाला संघाने जे.एन. पेटिट प्रशाला संघाची घोडदौड रोखली. मिलेनियमने १६ वर्षांखालील गटात पेटिट प्रशालेचा २-१ असा पराभव केला, तर १२ वर्षांखालील गटात पेटिट प्रशाला संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. स्पर्धेतील १६ वर्षांखालील गटात विजयी संघाकडून आदित्य कांबळे आणि रोहन देवस्तळीने गोल केले. अखेरच्या सत्रापर्यंत राखलेली २-० आघाडी मिलेनियमला अखेरपर्यंत राखता आली नाही. सामन्याच्या ५३व्या मिनिटाला पेटिट प्रशालेच्या यमन सय्यदने गोल करून पिछाडी भरून काढण्याचे काम केले.
त्यापूर्वी, जे.एन. पेटिट प्रशाला संघाला १२ वर्षांखालील गटात साद शेखच्या (३४वे मिनिट) गोलमुळे मिलेनियमविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत रोखता आला. त्यापूर्वी नील जोशीने २१व्या मिनिटाला मिलेनियम संघाला आघाडीवर नेले होते. या नंतर १४ वर्षांखालील गटात दानिश गोनालच्या तीन गोलच्या जोरावर पेटिट प्रशाला संघाने मिलेनियम प्रशाला संघावरच ९-० असा विजय मिळविला. युग चोवान आणि ओम दरेकर यांनी प्रत्येकी दोन गोल करून त्याला सुरेख साथ केली. अद्यान शेख आणि वेद काळेने अन्य गोल केले.
दुपारच्या सत्रात १२ वर्षांखालील गटात शौर्य परदेशीने नोंदवलेल्या पाच गोलच्या जोरावर हॅचिंग्ज प्रशाला संघाने ब्लू रीज प्रशाला संघाचा ९-० असा धुव्वा उढवला. शौर्यने ६,११,१९, २८ आणि ३०व्या मिनिटाला गोल केले. आर्यन जाफरीने त्याला ९ आणि २२व्या मिनिटाला गोल करून सुरेख साथ केली. अहर्षि हजरा आणि पार्थ पाटिल यांनी अन्य गोल केले. हॅचिंग्ज प्रशाला संघाने दुसऱ्या विजयाची नोंद करताना १४ वर्षांखालील गटात ब्लू रीज संघाचाच २-१ असा पराभव केला. परम राठोडने दोन गोल केले. वैश्याक राममोहनने ब्लू रीजचा एकमात्र गोल केला.
निकाल –
१२ वर्षांखालील – जे.एन. पेटिट प्रशाला १ (साद शेख ३४वे मिनिट) बरोबरी वि. मिलेनियम नॅशनल स्कूल १ (नील जोशी २१वे मिनिट)
हॅचिंग्ज प्रशाला ९ (शौर्य परदेशी ६,११, १९, २८, ३०वे मिनिट, आर्यन जाफरी ९, २२वे मिनिट, आहर्षि हजरा ३४वे, पार्थ पाटिल ३६वे मिनिट) वि.वि. ब्लू रीज स्कूल ०
१४ वर्षांखालील – जे.एन. पेटिट टेक्निकल प्रशाला ९ (दानिश गोनाल ८, १८, ३४वे मिनिट, युग चोवान ११, १६वे मिनिट, आद्यान शेख २५+१वे मिनिट, वेद कारळे ३९वे मिनिट, ओम दरेकर ४६, ४८वे मिनिट) वि.वि. मिलेनियम नॅशनल स्कूल ०
हॅचिंग्ज प्रशाला २ (परम राठोड ९, ४४वे मिनिट) वि.वि. ब्लू रीज पब्लिक स्कूल १ (वैश्याक राममोहन १८वे मिनिट)
१६ वर्षांखालील – मिलेनियम नॅशनल स्कूल २ (आदित्य कांबळे १९वे, रोहन देवस्थळी ४४वे मिनिट) वि.वि. जे.एन. पेटिट टेक्निकल प्रशाला १ (यमन सय्यद ५३वे मिनिट)
महत्वाचा बातम्या –
मँनचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी ब्रॉडने रचला इतिहास, दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या 8 विकेट्स
युवा भारतीय संघाकडून पाकिस्तान चारी मुंड्या चीत! हंगरगेकर-साई सुदर्शन ठरले हिरो