पुणे २६ जुलै २०२३ – टाटा ऑटोकॉम्प आंतरशालेय लॉयला करंडक फुटबॉल स्पर्धेत लॉयला प्रशाला संघाने बुधवारी दोन वयोगटातून, एतर हॅचिंग्जने एका गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
लॉयला माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन लॉयला प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले आहे. लॉयला प्रशाला संघाने १२ आणि १४ वर्षांखालील गटातून उपांत्य फेरी गाठली. हॅचिंग्जने १४ वर्षांखालील गटात आपली आगेकूच कायम राखली. लॉयला प्रशाला संघाने आरव इंगळे (३२वे मिनिट) आणि शौन आंग्रे (४०वे मिनिट) यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर विद्या व्हॅली प्रशालाचा संघाचा २-० असा पराभव केला. या गटातून यापूर्वी सेंट व्हिन्सेंट, हॅचिंग्ज आणि बिशप्स प्रशाला संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
लॉयला प्रशाला संघाने १४ वर्षांखालील गटात विद्या व्हॅली प्रशालेचाच ३-० असा पराभव केला. लॉयलाकडून डीन अॅन्थोनी, खारांशु गजरे, आयुष चव्हाण यांनी गोल केले. हॅचिंग्जने १४ वर्षांखालील गटात कल्याणी प्रशालेचे आव्हान ३-१ असे संपुष्टात आणले. कल्याणी प्रशालेने आर्यन मुळ्येच्या ३०व्या मिनिटाच्या गोलने आघाडी मिळवली होती. मात्र, त्यानंतर परम राठोडच्या (३८वे, ४३वे मिनिट) दोन आणि काश्विक गवळीच्या (५०वे मिनिट) गोलने हॅचिंग्जने विजय मिळविला.
निकाल (बाद फेरी) –
१२ वर्षांखालील – लॉयला प्रशाला २ (आरव इंगळे ३२वे मिनिट, शौन आंग्रे ४०वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली ०
१४ वर्षांखालील –
लॉयला प्रशाला ३ (डीन अॅन्थोनी ११वे मिनिट, खारांशु गजरे २५वे मिनिट, आयुष चव्हाण ४९वे मिनिट) वि.वि. विद्या व्हॅली ०
महत्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे