भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय मिळवत मालिका आपल्या नावे केले. त्यानंतर आता उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी नुकतेच नव्या जर्सी फोटोशूट केले. यादरम्यान सर्व खेळाडू मजामस्ती करताना दिसून आले.
Test Cricket ✅
On to the ODIs 😎📸#TeamIndia | #WIvIND pic.twitter.com/2jcx0s4Pfw
— BCCI (@BCCI) July 26, 2023
भारतीय संघाला नवे किट स्पॉन्सर म्हणून अग्रगण्य किट मॅन्युफॅक्चरर आदिदास हे प्रायोजित करत आहे. जून महिन्यात याबाबतचा कोट्यावधींचा करार झालेला. त्यानंतर आदिदास कंपनीने तिने प्रकारच्या सामन्यांसाठी वेगवेगळ्या जर्सी लॉन्च केल्या होत्या. त्यातील वनडे जर्सीमध्ये खेळाडू प्रथमच फोटोशूट करताना दिसला. बीसीसीआयने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विराट कोहली व रोहित शर्मा वगळता सर्वच प्रमुख खेळाडू दिसून आले. दरम्यान ईशान किशन व शुबमन गिल हे एकमेकांची नक्कल करताना दिसले.
उभय संघांमध्ये पहिला वनडे सामना 27 जुलै रोजी होईल. तर, दुसरा सामना 29 जुलै रोजी खेळला जाईल. हे दोन्ही सामने बार्बाडोस येथे होणार आहेत. मालिकेतील अखेरचा सामना एक ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथे होईल. त्यानंतर दोन्ही संघांत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), विराट कोहली, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार , उमरान मलिक, जयदेव उनाडकत.
(Team India New ODI Jersey Photoshoot Ahead West Indies Tour)
महत्वाच्या बातम्या –
जेम्स अँडरसनबाबत धक्कादायक ब्रेकिंग! निवृत्तीविषयी स्पष्टच बोलला वेगवान गोलंदाज, म्हणाला…
युवा फलंदाजांचे पाकिस्तानसाठी शतक आणि द्विशतक, श्रीलंका जवळपास 400 धावांनी मागे