पुणे २२ जुलै २०२३ – टाटा ऑटोकॉम्प पुरस्कृत आंतरशालेय लॉयल करंडक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी हॅचिंग्ज प्रशाला संघाला विजयासाठी झगडावे लागले. त्याचवेली मिलेनियम प्रशालेने दोन विजय मिळवून आगेकूच कायम राखली. लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेत हॅचिंग्ज प्रशालेने शौर्य परदेशाच्या एकमात्र गोलच्या जोरावर १२ वर्षांखालील गटात जे. एन. पेटिट प्रशालेवर विजय मिळविला.
स्पर्धेतील १४ वर्षांखालील गटात परम राठोड (३रे मिनिट) आणि इशान शौधरी (७वे मिनिट) यांनी पहिल्या दहा मिनिटांत नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर जे.एन. पेटिट प्रशाला संघावर २-० असा विजय मिळविला. मिलेनियम प्रशाला संगाने १२ वर्षांखालील गटात ब्लू रिज प्रशालेवर ९-१ असा दणदणीत विजय नोंदवला. नील जोशीने (१७, १९, २५, २७, ४०वे मिनिट) असे पाच गोल नोंदवून मिलेनियमला जणू एकाहाती विजय मिळवून दिला. शिवम कोटकरने तीन आणि अनय मोघेने एक गोल केला. ब्लू रिजचा एकमात्र गोल अनिरुद्ध प्रजापतीने केला.
१४ वर्षांखालील गटात मिलेनियमने अगदी अखेरच्या टप्प्यात ५०व्या मिनिटाला प्रथमेश गायकवाडने केलेल्या एकमात्र गोलच्या जोरावर ब्लू रिजचा १-० असा पराभव केला. दोन पराभवानंतर ब्लू रिज संघाने १६ वर्षांखालील गटात मात्र ब्लू रिज प्रशालेने मिलेनियमचा २-१ असा पराभव केला. अंग्रीम सिंग आणि विराज पाटीलने ब्लू रीजसाठी गोल केले. मिलेनियमचा एकमात्र गोपल आदित्य कांबळेने केला.
निकाल –
१२ वर्षांखालील – हॅचिंग्ज प्रशाला १ (शौर्य परदेशी २२वे मिनिट) वि.वि. जे.एन. पेटिट प्रशाला ०
मिलेनियम प्रशाला ९ (शिवम कोटकर १ले, ३रे, २१वे मिनिट, अनय मोघे १४वे, नील जोशी १७, १९, २५, २७, ४०वे मिनिट) वि.वि. ब्लू रिज पब्लिक स्कूल १ (अनिरुद्ध प्रजापती २६वे मिनिट)
१४ वर्षांखालील – हॅचिंग्ज प्रशाला २ (परम राठोड ३रे, इशान शौधरी ७वे मिनिट) वि.वि. जे.एन. पेटिट प्रशाला ०
मिलेनियम प्रशाला १ (प्रथमेश गायकवाड ५०वे मिनिट) वि.वि. ब्लू रिज पब्लिक प्रशाला ०
१६ वर्षांखालील – ब्लू रीज पब्लिक स्कूल २ (अंग्रीम सिंग ३१वे, विराज पाटील ३७वे मिनिट) वि.वि. मिलेनियम नॅशनल स्कूल १ (आदित्य कांबळे २६वे मिनिट)
(Loyola Cup Football । Hatchings’ hard-fought victory)
महत्वाच्या बातम्या –
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने
बांगलादेशने हिसकावला टीम इंडियाच्या विजयाचा घास! हरमन ब्रिगेडच्या हाराकरीने सामना टाय