निकोलस पूरनच्या मजेशीर अंदाजाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. आयपीएल 2025 हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा पूरन केवळ आपल्या आक्रमक फलंदाजीसाठीच नव्हे, तर त्याच्या दिलखुलास आणि मनोरंजक स्वभावासाठीही चर्चेत आहे. Nicholas Pooran funny
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पूरन आणि लखनऊच्या संघातील इतर खेळाडू हिंदी गाण्यांवर सूर लावताना दिसत आहेत. Nicholas Pooran singing विशेषतः “चन्ना मेरेया” या भावनिक गाण्यावर निकोलस पूरनने गाण्याचा प्रयत्न केला, त्याची हिंदी बोलण्याची शैली व गाण्याचा उत्साह प्रेक्षकांच्या मनाला भिडला. Channa Mereya Nicholas Pooran
पाहा व्हिडिओ-
Nicholas Pooran singing Hindi song. ????pic.twitter.com/3jiTl1iJI5
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2025
पूरनचा हा वेगळाच अंदाज चाहत्यांना भारावून टाकणारा आहे. मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा हा खेळाडू मैदानाबाहेर मात्र खूप हळवा आहे. Nicholas Pooran Hindi song
यंदाच्या हंगामात निकोलस पूरनने 14 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 43.67च्या सरासरीने 524 धावा केल्या आहेत. याशिवाय तो आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक षटकार मारल्या आहेत. आयपीएल 2025 हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 14 सामन्यांपैकी 6 विजय आणि 8 पराभवांसह त्यांनी 12 गुण मिळवले आणि गुणतालिकेत सातव्या स्थानावर राहिले .






