इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून अनेक खेळाडू दुखापतीमुळे हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच बाहेर पडले होते. तसेच, काही खेळाडू स्पर्धेदरम्यान बाहेर पडले. अशात या यादीत आणखी खेळाडूंचा समावेश झाला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाबाबत धक्कादायक बातमी समोर येत आहे. लखनऊचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट हा आयपीएल 2023मधून बाहेर पडला आहे. रविवारी (दि. 31 एप्रिल) नेट्समध्ये गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो आता उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामातून बाहेर पडला आहे. मात्र, तो 7 जूनपासून इंग्लंडच्या के ओव्हलमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी वेळेवर फिट होईल. उनाडकट बाहेर पडल्यामुळे लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, हा लखनऊसाठी दुसरा धक्का आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1653623549163360258
उनाडकट रविवारी लखनऊमध्ये नेट्समध्ये गोलंदाजी करत होता. तो राऊंड द विकेट धावत जाऊन घेऊन गोलंदाजी करत होता. त्यावेळी त्याचा पाय दोरीत अडकला. यामध्ये तो कोपरावर कोसळला. त्यानंतर त्याला खांद्याजवळ बर्फही लावण्यात आला. वृत्तांनुसार, उनाडकट स्कॅनसाठी मुंबईला गेला होता. तसेच, बीसीसीआयने नियुक्त केलेल्या तज्ञ सल्लागारांपैकी एकाला भेटला होता. बोर्डाच्या वैद्यकीय पथकासोबत सल्लामसलत केल्यानंतर लखनऊ संघाने उनाडकटला आयपीएलमधून हटवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या उपचारासाठी बंगळुरूतील एनसीएमध्ये जाण्याची अपेक्षा आहे, जेणेकरून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी इंग्लंडला जाण्यासाठी फिट होऊ शकेल.
https://twitter.com/PathakRidhima/status/1653662009567879170
उनाडकटव्यतिरिक्त संघाचा कर्णधार केएल राहुल हादेखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो हंगामातून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. केएल राहुल याला सोमवारी (दि. 1 मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो फलंदाजीला लवकर येऊ शकला नव्हता. तो संघाच्या डावात 11व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. (lsg pacer jaydev unadkat ruled out of remainder ipl 2023 know the reason)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने खरंच नवीनला दाखवला बूट? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा
‘आम्हीही बाचाबाची करायचो, पण हे असलं…’, गंभीर-विराट प्रकरणावर गावसकरांची कडक शिक्षेची मागणी






