इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या हंगामात वैर असलेल्या खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. आयपीएलपूर्वीच आर अश्विन आणि जोस बटलर एकत्र आले आहेत. तर धमकीपर्यंत गेलेले कृणाल पंड्या आणि दिपक हुडा यांचे भांडणही हळूहळू मिटताना दिसत आहे. आयपीएलमधील नव्या लखनऊ सुपरजायंट्स फ्रँचायझीने त्यांना विकत घेतले आहे. हे दोन्ही खेळाडू लखनऊकडून आयपीएल सामने खेळताना वैर विसरून मित्र बनल्याचे दिसत आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK vs LSG) शुक्रवारी (३१ मार्च) लखनऊ सुपरजायंट्सने हंगामातील दुसरा सामना खेळला. मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान कृणाल आणि दिपक (Krunal Pandya & Deepak Hooda) एकत्र वार्मअप करताना दिसले. लखनऊच्या डावातील १२व्या षटकादरम्यान जेव्हा कॅमेरा लखनऊच्या डगआऊटकडे फिरला. तेव्हा हे दोन्ही खेळाडू निराळ्या पद्धतीने वार्मअप करताना दिसले (Deepak & Krunal Reunite) होते.
डगआऊटमध्ये एकीकडे कृणाल मोठा चेंडू घेऊन वार्मअप करत होता. तर दुसरीकडे त्याच्या बाजूला उभा राहून दिपक बॅटने वार्मअप करताना दिसला. यापूर्वीही गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यादरम्यानही हे दोन्ही खेळाडू भर मैदानात एकमेकांची गळाभेट घेताना दिसले होते.
Even commentators cannot hold their laugh 😂
Epic warmup by Krunal Pandya#IPL2022 #IPL2022SCHEDULE #CSKvLSG pic.twitter.com/WPXrOWOG7w
— Mandar (@mandar007rocks) March 31, 2022
कृणाल-दिपकमधील भांडण काय होते?
दरम्यान जानेवारी २०२१ मध्ये दिपकला बडोदाच्या टी२० संघातून निलंबित करण्यात आले होते. तेव्हाने दिपकने कृणालवर असाही आरोप केला होता की, कृणालने त्याला त्याची कारकिर्द संपुष्टात आणण्याची धमकी दिली होती. तसेच आपल्याशी कृणालने शिवीगाळ केल्याचाही आरोप दिपककडून करण्यात आला होता. हे प्रकरण त्यावेळी इतके चर्चेत आले होते की, मेगा लिलावात लखनऊने या दोघांना विकत घेतल्यावरही त्यांच्या निर्णयाची भरपूर चर्चा झाली होती.
चेन्नई-लखनऊमध्ये झाली रोमांचक लढत
चेन्नई विरुद्ध लखनऊ सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या होत्या. यामध्ये सलामीवीर रॉबिन उथप्पाचे अर्धशतक आणि शिवम दुबेच्या ४९ धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरात लखनऊने १९.३ षटकांमध्येच ४ विकेट्सच्या नुकसानावर चेन्नईचे आव्हान पूर्ण केले होते. लखनऊला विजय मिळवून देण्यात क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ६० धावा केल्या होत्या. तसेच एविन लुईने नाबाद ५५ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच्या योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानचा आझम भारताच्या कोहलीला ठरला सरस, पंधरावे वनडे शतक ठोकत केला ‘वर्ल्डरेकॉर्ड’
धोनीने नेतृत्व सोडताच पलटले चेन्नईचे नशीब! आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ओढावली ‘अशी’ नामुष्की
आझम आणि इमामपुढे फिके पडले ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज, धुव्वादार शतके करत विक्रमांचे रचले मनोरे