इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला बुधवारी (दि. 24 मे) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअम येथे सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून एका संघाकडे क्वालिफायर दोन सामन्यात पोहोचण्याची संधी असेल, तर दुसऱ्या संघाला आयपीएल 2023 प्ले-ऑफमधून बाहेर पडावे लागेल. या सामन्यात लखनऊचे नेतृत्व कृणाल पंड्या करत आहे, तर मुंबईची धुरा रोहित शर्मा याच्या खांद्यावर आहे.
क्रिकेटप्रेमी लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स संघातील हा एलिमिनेटर सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमा ऍपवर पाहू शकतात. चला तर या सामन्यापूर्वी त्याच्या खेळपट्टी आणि संघाच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर टाकूयात…
खेळपट्टी
एमए चिदंबरम स्टेडिअम (MA Chidambaram Stadium) येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी उपयुक्त आहे. चेपॉक (Chepauk) स्टेडिअमच्या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. इथे जुन्या चेंडूने षटकांमध्ये फिरकीपटूही विकेट्स घेताना दिसतात. या खेळपट्टीवर वळण मिळत असल्यामुळे फिरकीपटूंचा बोलबाला पाहायला मिळतो. चेन्नई संघाने या मैदानावर अनेक सामन्यात 200हून अधिक धावसंख्या उभारली आहे. इथे अनेक सामने अधिक धावसंख्येचे असतात. या सामन्यातही चाहत्यांना रोमांचक पाहायला मिळू शकतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्यास पसंती दर्शवतो. तसेच, या खेळपट्टीवर धावांचा पाठलागही सहजरीत्या केला जाऊ शकतो.
दोन्ही संघांचा हंगामातील प्रवास
लखनऊ संघाने या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळेल आहेत. त्यापैकी 8 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे, तर 5 सामने गमवावे लागले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे 17 गुणांसह ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी राहिले. याव्यतिरिक्त मागील हंगामात मुंबई गुणतालिकेत तळाशी राहिली होती. मात्र, यावेळी मुंबईने 14 पैकी 8 सामने जिंकत आणि 6 सामने गमावत 16 गुणांसह गुणतालिकेतील चौथे स्थान मिळवले. विशेष म्हणजे, लखनऊ विरुद्ध मुंबई आयपीएल 2023च्या 63व्या सामन्यात आमने-सामने आले होते. हा सामना लखनऊने 5 धावांनी जिंकला होता. (lsg vs mi ipl 2023 eliminator lucknow super giants vs mumbai indians know all here)
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
लखनऊ सुपर जायंट्स
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, कृणाल पंड्या (कर्णधार), मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, नवीन उल-हक, रवी बिश्नोई, स्वप्निल सिंग, मोहसिन खान,
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेविड, नेहाल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बोंबला! ‘या’ 3 कारणांमुळे थेट फायनलमध्ये पोहोचू शकतो Gujarat Titans संघ, धोनीसेनेच्या अडचणी वाढणार
धोनीचा रागराग करणाऱ्यांना हार्दिकने दोनच शब्दात केले गार; म्हणाला, ‘तसंच करायचंय ना मग…’