पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. हा सामना लखनऊमधील एकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला, जो एलएसजी संघाचे होम ग्राउंड आहे. लखनऊ संघाचा मार्गदर्शक झहीर खान त्याच्या घरच्या मैदानाच्या खेळपट्टीवर खूश नाही, त्याने सामन्यानंतर याबद्दल मोठे विधान केले.
लखनऊ सुपर जायंट्सने फक्त 35 धावांमध्ये कर्णधारासह 3 विकेट गमावल्या. निकोलस पूरन (44) आणि आयुष बदोनी (41) यांनी संघासाठी चांगली खेळी खेळली, संघला 171 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. तथापि, पंजाब किंग्जना हे लक्ष्य गाठण्यात कोणतीही अडचण आली नाही. संघाने 16.2 षटकांत लक्ष्य गाठले आणि 8 विकेट्सने विजय मिळवला. प्रभसिमरन सिंगने 69 धावा केल्या, ज्यासाठी त्याला सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. श्रेयस अय्यरने नाबाद 52 धावा केल्या. सामन्यानंतर झहीर खानने खेळपट्टीबद्दल सांगितले की, असे वाटत होते की क्युरेटर पंजाबचा आहे.
Zaheer Khan said, "you've seen teams have a home advantage in the IPL. The curator is not thinking that it's a home game, it looked like it was a Punjab curator out here in Lucknow". pic.twitter.com/61yQ5cQmhI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2025
झहीर खान मॅचनंतर म्हणाला की, निराशाजनक बाब हीसुद्धा होती की हा सामना होम ग्राउंडवर होता. आयपीएलमध्ये अनेकदा दिसून आलंय की संघ आपल्या होम ग्राउंडचा थोडाफार फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. पण एकाना स्टेडियमच्या पिच क्यूरेटरनी तसं काही केलं नाही. असं वाटत होतं की जणू ते पंजाबच्या बाजूचे आहेत. जरी झहीर हे बोलताना थोडं हसला, तरी त्याच्या बोलण्यात नाराजी स्पष्ट दिसत होती.
एकाना स्टेडियमवर होणारे सामने
4 एप्रिल – एलएसजी विरुद्ध एमआय
12 एप्रिल – एलएसजी विरुद्ध जीटी
14 एप्रिल – एलएसजी विरुद्ध सीएसके
22 एप्रिल – एलएसजी विरुद्ध डीसी
9 मे – एलएसजी विरुद्ध आरसीबी
18 मे – एलएसजी विरुद्ध एसआरएच