---Advertisement---

आवेशने विकेट्सचा चौकार ‘तिला’ केला समर्पित; म्हणाला, ‘ती हॉस्पिटलमधूनही मला प्रेरणा देत होती’

On: मंगळवार, एप्रिल 5, 2022 4:35 PM
Cricketer-Avesh-Khan
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामाची सुरुवात रोमांचक झाली आहे. आतापर्यंत हंगामातील १२ सामने खेळले गेले असून १२वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात हैदराबादला लखनऊने १२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या विजयाचे हिरो ठरले आवेश खान आणि दीपक हुड्डा. आवेश खानने ४ षटकात २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या, तर हुड्डाने ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. यानंतर आवेश खानने या कामगिरीचे श्रेय आपल्या आईला दिले आहे. 

आयपीएलच्या अधिकृत अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. दीपक हुड्डा आणि आवेश खान बोलताना दिसत आहेत. यावेळी बोलताना आवेश खान म्हणाला, “माझी आई दवाखान्यात दाखल आहे. ती मला प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे हे प्रदर्शन मी माझ्या आईला समर्पित करतो.” आवेशशिवाय दीपक हुड्डा सुद्धा या हंगामात धमाल करताना दिसत आहे. त्या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Cb9MWogFVru/?utm_source=ig_embed&ig_rid=6ff29647-61c0-4219-9509-2b4dc6b65bb8

दीपक हुड्डाने मागील तीन सामन्यांमध्ये ४०च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. यामध्ये एका शानदार शतकाचासुद्धा समावेश आहे. आवेशसोबतच्या मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, “जेव्हा संघाला माझी गरज होती, तेव्हा धावा करण्याची जबाबदारी घेतली.” आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हुड्डा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या अगोदर राजस्थान राॅयल्सचा जाॅस बटलर आणि मुंबईचा इशान किशनने हे खेळाडू आहेत.

लखनऊ संघाने ३ सामने खेळले असून दोन सामन्यांमध्ये संघाला अपयश आले आहे. पहिल्या सामन्यात गुजरातने ५ धावांनी पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात लखनऊने चेन्नईला ६ विकेट्सने पराभूत केले. तसेच तिसरा सामना संघाने हैदराबादविरुद्ध खेळला, ज्यामध्ये संघाने हैदराबादला १२ धावांनी पराभूत केले. लखनऊ संघ आता आपला चौथा सामना ७ एप्रिलला दिल्लीविरुद्ध खेळणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

अर्रर्र! आरसीबीसाठी ट्रेनिंग सुरू करूनही मॅक्सवेल खेळणार नाही आजचा सामना; पण कधी उतरणार मैदानात?

रोनाल्डो बनून झोपेतून उठला तर काय करणार? विराटने दिले मजेशीर उत्तर

शाहरुख खानच्या टीमकडून खेळणार वेस्ट इंडिजचे ‘हे’ दोन विस्फोटक फलंदाज; विरोधी संघांच्या बत्त्या करणार गुल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---