इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये नव्याने सामील झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा विजयरथ सुसाट धावतोय. गुरुवारी (०७ एप्रिल) मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील क्रिकेट अकादमी स्टेडिअमवर झालेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध लखनऊने ६ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा या हंगामातील तिसरा विजय होता. या हंगामात त्यांना ४ सामन्यातील ३ सामन्यात विजय, तर १ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. असे असले, तरी लखनऊ संघासाठी हा विजय महत्त्वपूर्ण राहिला. लखनऊच्या विजयाचा शिल्पकार क्विंटन डी कॉक ठरला. डी कॉकला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनऊचा (Lucknow Super Giants) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. तसेच, दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी दिल्लीने निर्धारित २० षटकात ३ विकेट्स गमावत १४९ धावा केल्या. दिल्लीचे १५० धावांचे हे आव्हान लखनऊने १९.४ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले.
Super Giants hai hum. Jalwa hai yahan humaara! 💪
LSG beat DC by 6 wickets.#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL #Lucknow #UttarPradesh #LSG2022 pic.twitter.com/8uwxIDbcAU— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 7, 2022
लखनऊकडून फलंदाजी करताना क्विंटन डी कॉकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५२ चेंडूंचा सामना करताना ८० धावा केल्या. या धावा करताना त्याने २ षटकार आणि ९ चौकार ठोकल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार केएल राहुलने २४ धावा केल्या. दीपक हुड्डानेही ११ धावांचे योगदान दिले. तसेच, कृणाल पंड्याने १९, तर आयुष बदोनीने १० धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
यावेळी दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ३.४ षटके गोलंदाजी करताना ३१ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त ललित यादव आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) सर्वाधिक धावा केल्या. मागील २ सामन्यांपासून शॉची बॅट शांत होती. मात्र, लखनऊविरुद्ध त्याने चांगली कामगिरी केली. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ९ चौकारांसह ६१ धावा ठोकल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार रिषभ पंत आणि सर्फराज खान यांनी नाबाद अनुक्रमे ३९ आणि ३६ धावा केल्या होत्या. या दोघांव्यतिरिक्त पहिला सामना खेळत असलेला डेविड वॉर्नर ४ धावांवर तंबूत परतला, तर रोवमन पॉवेलला फक्त ३ धावा करता आल्या.
यावेळी लखनऊ संघाकडून गोलंदाजी करताना रवी बिश्नोईने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कृष्णाप्पा गौतमनेही १ विकेट खिशात घातली.
या सामन्यातील विजयानंतर लखनऊ संघाला गुणतालिकेत फायदा झाला आहे. त्यांना ६ गुण मिळाले असून, दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाले आहेत, तर दिल्ली संघ सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पदार्पणाच्या सामन्यातच ‘बेबी एबी’ने ठोकला गगनचुंबी ‘नो लूक सिक्स’, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक