इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेचा हंगाम नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने बाजी मारत चौथ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. यानंतर आता आगामी आयपीएल २०२२ स्पर्धेत क्रिकेट चाहत्यांना मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत खेळाडूंचा मोठा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. तर दोन नवीन संघांची देखील एन्ट्री होणार आहे, ज्याचा लिलाव सोमवारी (२५ ऑक्टोबर) पार पडला.
आयपीएल २०२२ स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी ८ नव्हे तर १० संघ खेळताना दिसून येणार आहेत. यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या २ नव्या संघांचा समावेश आहे. या दोन्ही संघासाठी सोमवारी (२५ ऑक्टोबर) लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
अहमदाबाद संघ सीवीसी कॅपिटल तर लखनऊ संघाला संजीव गोयंका आरपीएसजी वेंचर्स कंपनीने खरेदी केले आहे. या संघांचा लिलाव झाल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील दोन्ही कंपन्यांचे अभिनंदन केले आहे. संजय गोयंका यांचा हा दुसरा आयपीएल संघ असणार आहे. यापूर्वी देखील त्यांनी आयपीएल स्पर्धेत संघ खरेदी केला होता. त्यांनी रायजिंग पुणे सुपरजायंट्स हा संघ खरेदी केला होता, ज्या संघाने २ आयपीएल स्पर्धेत स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले होते.
सीव्हीसी कॅपिटलने खरेदी केला अहमदाबाद संघ
सीव्हीसी कॅपिटल जगभरातील क्रीडा स्पर्धांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखली जाते. यापूर्वी ते फॉर्म्युला १ चे मालक होते. तर अलीकडेच त्यांनी ला लिगा स्पर्धेत देखील गुंतवणूक केली होती. सीव्हीसी कॅपिटल संघाचे सामने हे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहेत. नुकतेच या स्टेडियमचे नामकरण करून नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. तसेच हे जगातील सर्वात मोठे स्टेडियम आहे.
आरपीएसजी ग्रुपने खरेदी केला लखनऊ संघ
आरपीएसजी ग्रुपने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दुसऱ्यांदा कुठला संघ खरेदी केला आहे. यापूर्वी २०१६ आणि २०१७ मध्ये झालेल्या हंगामात त्यांनी रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघ खरेदी केला होता. आता या ग्रुपने लखनऊ संघ खरेदी केला आहे, ज्याचे सामने अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर पार पडतील.
महत्त्वाच्या बातम्या-
तोडफोड फलंदाजी! अफगानी फलंदाजाचा सॉलिड षटकार अन् सीमारेषेपार असलेल्या फ्रीजच्या फुटल्या काचा
‘भारताला हरवा, ब्लँक चेक मिळवा’, म्हणणारे रमीज राजा ट्रोल; नेटकरी म्हणाले, चुना लगा गया रे!