---Advertisement---

हंगामातील पहिल्या विजयासाठी लखनऊला 191 धावांची गरज: हैदाराबादची कठीण परिक्षा

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील सातवा हैदाराबद आणि लखनऊ यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या डावात खेळताना हैदारबादने 20 षटकात 9 गडी गमावून 190 धावा केल्या आहेत.

टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करत लखनऊ संघाने शानदार कामगिरी केली. हैदराबादला सुरुवातीला धक्के दिल्याने संघ मोठ्या 200+ धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात मागे पडला. तथापि, ट्रेव्हिड हेडने 47 धावांची खेळी खेळली मात्र तो बाद झाला, त्याला प्रिन्स यादवने बाद केले. सलामीवीर अभिषेक शर्मा देखील 6 धावांवर बाद झाला. मागील सामन्यातील हिरो ईशान किशन गोल्डन डकवर बाद झाला. त्याला शार्दुल ठाकूरने तंबूत पाठवले. नितीश रेड्डी (32) क्लासेन (26) अनिकेत वर्मा (36) यांच्या छोट्या छोट्या खेळीच्या जोरावर संघाने 20 षटकात 190 जोडल्या.

गोलंदाजीत शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, त्याने 4 षटकात 34 धावा दिल्या. त्याच्याशिवाय दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---