---Advertisement---

लेट्स प्ले! लखनऊमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा स्पेशल सराव, चिमुकल्यांना दिले क्रिकेटचे धडे

---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने आपली सुरुवात शानदार केली आहे. श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय मिळवल्यानंतर आता ते आपली विजयी लय कायम राखण्याचा प्रयत्न करतील.  ते आपला पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतील. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ लखनऊ येथे पोहोचला असून, त्यांनी सरावाला सुरुवात केली आहे. या सराव सत्रात त्यांनी काही लहान मुलांना देखील आमंत्रित केलेले.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1711683722683220466?t=bcLt7PhFaWCW_uPnf8fmPg&s=19

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान लखनऊ येथील अटलबिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम येथे 12 ऑक्टोबर रोजी सामना खेळला जाईल. दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलेले. तर, ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते. अशा स्थितीत दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील.

दक्षिण आफ्रिका संघ सोमवारी (9 ऑक्टोबर) लखनऊ येथे पोहोचला. त्यानंतर त्यांनी मंगळवारी आपल्या सरावाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी काही लहान मुलांना देखील सराव सत्रात निमंत्रित केले होते. यावेळी दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बवुमा, अनुभवी डेव्हिड मिलर, क्विंटन डी कॉक हे खेळाडू या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसले. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्ध आपल्या अभियानाची जोरदार सुरुवात केली आहे. डी कॉक, मार्करम व डसेन यांच्या शतकांमूळे दक्षिण आफ्रिकेने विक्रमी 428 धावा उभारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेला 102 धावांनी पराभूत केले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला भारताने अत्यंत सहजतेने पराभूत केलेले. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला केवळ 199 धावांवर रोखलेले. त्यानंतर विराट कोहली व केएल राहुल यांच्या खेळामुळे भारताने सहा गडी राखून विजय मिळवला.

(Lucknow school kids playing cricket with the South African team)

हेही वाचा-
जाळ अन् धूर संगटच! मेंडिसने लंकेकडून पाकिस्तानविरुद्ध ठोकले वर्ल्डकपमधील वेगवान शतक, फक्त…
टोप्ली पुढे बांगलादेशची टॉप ऑर्डर गुडघ्यावर! तीनच षटकात केली वाताहात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---