गुरुवारी आयपीएलच्या 18व्या हंगामाच्या सातव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच विकेट्सने पराभव केला. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत नऊ गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात, लखनऊ 23 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. लखनऊने 16.1 षटकांत पाच गडी गमावून 193 धावा केल्या. लखनऊकडून निकोलस पूरनने सर्वाधिक 70 धावा केल्या. या पराभवामुळे हैदराबादचा संघ पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे, तर लखनऊ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात एडन मार्क्रमच्या रूपात संघाने पहिली विकेट गमावली. यानंतर, पूरन आणि मार्श यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. निकोलस पूरन 26 चेंडूत 70 धावा काढून बाद झाला तर मिचेल मार्श 31 चेंडूत 52 धावा काढून बाद झाला. शेवटी डेव्हिड मिलर 13 तर अब्दुल समद 22 धावांवर नाबाद परतले. हैदराबादकडून पॅट कमिन्सने 2 तर शमी, झंपा आणि हर्षलने प्रत्येकी १ गडी बाद केला.
प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत नऊ गडी गमावून 190 धावा केल्या. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 47 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. तिसऱ्या षटकात शार्दुल ठाकूरने अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांना सलग चेंडूंवर बाद केले. हेनरिक क्लासेन 26 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर धावबाद झाला. नितीश कुमारने 28 चेंडूत 32 धावांचे योगदान दिले. अनिकेतने 13 चेंडूत 36 धावा केल्या. लखनऊकडून शार्दुल ठाकूरने 4 विकेट्स घेतल्या.
Hyderabad conquered ✅
— IndianPremierLeague (@IPL) March 27, 2025
Win secured ✅#LSG get their first ???? of #TATAIPL 2025 with a comfortable victory over #SRH ????
Scorecard ▶ https://t.co/X6vyVEvxwz#SRHvLSG | @LucknowIPL pic.twitter.com/7lI4DESvQx






