आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव पुढील महिन्यात होणार आहे. त्यापूर्वी सर्व फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी 31 ऑक्टोबरपर्यंत सादर करावी लागेल. ही डेडलाईन संपायला आता काही दिवसच बाकी आहेत. त्याआधी लखनऊ सुपर जायंट्सशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.
काही काळापूर्वी बातमी आली होती की, लखनऊ फ्रँचायझी कर्णधार केएल राहुलला रिटेन करणार नाही. आता एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, एलएसजी केवळ तीन कॅप्ड खेळाडूंना रिटेन करणार आहे. याशिवाय दोन अनकॅप्ड खेळाडू रिटेन केले जातील. लखनऊच्या कॅप्ड खेळाडूंमध्ये निकोलस पूरन, मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. तर अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयुष बदोनी आणि मोहसिन खान यांची नावं समोर आली आहेत. पूरन संघाचा पहिला रिटेन्शन असेल.
वेस्ट इंडिजचा झंझावाती फलंदाज निकोलस पूरन सध्या टी20 क्रिकेटमध्ये खळबळ माजवत आहे. त्याच्याकडे एकहाती सामना जिंकवण्याची क्षमता आहे. या कारणामुळे लखनऊच्या संघानं त्याला केएल राहुल ऐवजी रिटेन करण्याचा निर्णय घेतला. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, निकोलस पूरनला 18 कोटी रुपये मिळतील. तर मयंक यादव आणि रवी बिश्नोई यांना अनुक्रमे 14 कोटी आणि 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं जाईल. अशाप्रकारे लखनऊला या तिघांना रिटेन करण्यासाठी एकूण 51 कोटी रुपये खर्च करावे लागतील.
युवा अष्टपैलू आयुष बदोनीनं अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आपल्या तुफानी फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलं. याशिवाय त्यानं आयपीएलमध्ये लखनऊ संघासाठी अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या आहेत. यामुळे त्याला 4 कोटी रुपयांच्या किमतीत अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करता येईल. त्याच्याशिवाय वेगवान गोलंदाज मोहसीन खानलाही रिटेन करण्यात आल्याचं वृत्त आहे. मोहसीन अद्याप टीम इंडियाकडून खेळलेला नाही. यामुळे तो देखील अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केला जाईल.
लखनऊ सुपर जायंट्सचे 5 रिटेन्शन्स
1) निकोलस पूरन
२) मयंक यादव
3) रवी बिष्णोई
4) आयुष बदोनी
5) मोहसीन खान
हेही वाचा –
रणजी ट्रॉफीमध्ये केकेआरच्या गोलंदाजाची धमाल कामगिरी, बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी ठोकला दावा
“इंग्लंडच्या फलंदाजांना अक्कल नाही”, पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर दिग्गज भडकला
“विराट कोहलीनं देशांतर्गत क्रिकेट खेळावं”, कामगिरी सुधारण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला