इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ३७व्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा पुन्हा एकदा हंगामातील सलग आठव्या सामन्यात दारुण पराभव झाला. रविवारी (दि. २४ एप्रिल) मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडिअमवर लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध पार पडलेल्या या सामन्यात मुंबईला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊच्या विजयाचे शिल्पकार कर्णधार केएल राहुल आणि कृणाल पंड्या ठरले. राहुलला त्याच्या शानदार शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. (Lucknow Super Giants won by 36 runs Against Mumbai Indians)
पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या मुंबईने (Mumbai Indians) या सामन्यात नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या लखनऊ (Lucknow Super Giants) संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १६८ धावांचा डोंगर उभा केला होता. लखनऊच्या १६९ धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाला ८ विकेट्स गमावत १३२ धावाच करता आल्या. यामुळे मुंबई पुन्हा एकदा पराभवाच्या खाईत पडला.
That's that from Match 37 and @LucknowIPL take this home with a 36-run win over #MumbaiIndians
Scorecard – https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/9aLniT8oHi
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
मुंबईची पुन्हा निराशा
मुंबईकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने (Rohit Sharma) ३९ धावांचे योगदान दिले. या धावा त्याने ३१ चेंडूंत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने केल्या. तसेच, तिलक वर्माने ३८ आणि कायरन पोलार्डने १९ धावांचे योगदान दिले. यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. मुंबईचा १५.२५ कोटींचा खेळाडू इशान किशन फक्त ८ धावा करून तंबूत परतला. तसेच, ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा डेवाल्ड ब्रेविसही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने फक्त ३ धावा केल्या. सूर्यकुमार यादवची बॅट या सामन्यात तळपलीच नाही. तोही ७ धावांवरच तंबूत परतला. यामुळे मुंबईची पुन्हा निराशा झाली.
We're back to winning ways! What a match! 😍
Bowlers ne chaar chand laga diye 💙#AbApniBaariHai #IPL2022 #LSGvsMI pic.twitter.com/Uv6BjYYBvR— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 24, 2022
यावेळी लखनऊकडून गोलंदाजी करताना कृणाल पंड्याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. मोहसिन खान, रवी बिश्नोई आणि आयुष बदोनी यांना प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
केएल राहुलचे विक्रमी शतक
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाकडून कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक साकारले. त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार आणि १२ चौकारांच्या मदतीने १०३ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त फक्त मनीष पांडेला २२ धावा करता आल्या. इतर फलंदाजांना २० धावांचा आकडाही पार करता आला नाही. मात्र, याचा फटका संघाला बसला नाही. कारण कर्णधाराच्या अफलातून खेळीमुळे लखनऊने सन्मानकारक धावसंख्या उभारली होती, जी पार करण्यात मुंबईचे फलंदाज अपयशी ठरले.
यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना रिले मेरेडिथ आणि कायरन पोलार्ड यांनी प्रत्येकी २ विकेट्स खिशात घातल्या. तसेच, डॅनियल सॅम्स आणि जसप्रीत बुमराह यांनी १ विकेट घेतली.
या विजयासह लखनऊने गुणतालिकेत चौथा क्रमांक गाठला. दुसरीकडे, मुंबई संघाची गाडी गुणतालिकेतील शेवटच्या स्थानाचे स्टेशन सोडायचं नावच घेत नाहीये.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कडकच ना! इकडं गुजरातला मिळाली विकेट अन् तिकडं हार्दिक पंड्याच्या पत्नीनं लावला ठुमका