---Advertisement---

प्रतिभा असूनही ‘हे’ ३ खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधील स्थानासाठी करतायत संघर्ष, एकाने संघाला बनवलंय चॅम्पियन

On: रविवार, एप्रिल 24, 2022 7:57 PM
Sandeep-Sharma-And-Glenn-Phillips
---Advertisement---

आयपीएल २०२२च्या लीग स्टेजचे निम्मे सामने खेळले गेले आहेत. शनिवारी (दि. २३ एप्रिल) हंगामातील ३६ सामना सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्र बेंगलोरविरुद्ध जिंकला. सालाबादप्रमाणे चालू हंगामात देखील काही नवीन चेहऱ्यांना प्रसिद्धी नक्कीच मिळाली आहे, पण काही खेळाडू असे आहेत, ज्यांना अद्याप खेळण्याची संधीच मिळालेली नाहीये.

चालू आयपीएल हंगामात खेळपट्टीवर फलंदाज मोठी धावसंख्या करताना दिसत आहे आणि सामने अधिक रोमांचक झाले आहेत. हंगामात अनेक हायस्कोरिंग सामने पाहायला मिळाले आहेत. काही संघांकडे चांगली प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी पुरेसे खेळाडू नाहीत, तर काहींकडे अनेक गुणवंत खेळाडू बेंचवर बसून आहेत. आपण या लेखात अशाच तीन खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, जे संघासाठी महत्वाचे योगदान देऊ शकतात, पण त्यांच्या संघाने त्यांना अद्याप संधी दिलेली नाहीये.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ग्लेन फिलिप्स
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याला मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने १.५ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. परंतु आतापर्यंत एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाहीये. यष्टीरक्षक निकोलस पूरन आतापर्यंत संघासाठी कोणतेच महत्वाचे प्रदर्शन करू शकलेला नाहीये. अशात आगामी सामन्यांमध्ये फिलिप्सला संधी मिळू शकते.

फिलिप्स त्याच्या धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो जगातील जवळपास सर्व टी-२० लीगमध्ये खेळला आहे. संघाच्या गरजेनुसार सलामीसाठी किंवा मध्यक्रमात फलंदाजी करू शकतो. या २५ वर्षीय खेळाडूकडे १६३ टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. या सामन्यांमध्ये त्याने १४०.५६च्या स्ट्राईक रेटने ४३२१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतके आणि २७ अर्धशतके देखील केली.

संदीप शर्मा
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज संदीप शर्मा (Sandeep Sharma) या आयपीएल हंगामात पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे. मागच्या हंगामात सनरायझर्स हैदराबादसाठी खेळणाऱ्या संदीपचे घरच्या संघात पुन्हा आगमन झाले आहे. संदीप नवीन चेंडूने विरोधी संघाची वरची फळी उद्ध्वस्त करू शकतो. तो चेंडूला चांगल्याप्रकारे सीम देखील करू शकतो.

पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी मागच्या काही सामन्यात खूप धावा खर्च केल्या आहेत. अशात कर्णधार मयंक अगरवाल या अनुभवी वेगवान गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करू शकतो. अर्शदीप सिंग आणि संदीप शर्माची जोडी विरोधी संघाच्या फलंदाजांना चांगलीच अडचणीत टाकू शकते. संदीपने आतापर्यंत आयपीएलमध्ये १०० सामने खेळले आहे. यामध्ये त्याने ७.७९च्या इकॉनॉमीसह धावा खर्च केल्या आहेत.

यश धूल
भारताच्या १९ वर्षाखालील संघाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार यश धूल (Yash Dhull) आयपीएल २०२२मध्ये धमाका करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतु दिल्ली कॅपिटल्सने त्याला अजून एकाही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाहीये. विश्वचषक जिंकल्यानंतर रणजी ट्रॉफीत देखील त्याने जबरदस्त प्रदर्शन केले होते. दिल्लीसाठी पहिल्या सामन्यातील दोन्ही डावांमध्ये धूलने शतकी खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म पाहून दिल्ली कॅपिटल्सने त्याला मेगा लिलावात खरेदी केले.

सरफराज खान आणि ललित यादव सध्या धावा करण्यासाठी झगडत असल्याचे दिसत आहे. अशातच राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर दिल्ली कॅपिट्लस आगामी सामन्यात यश धूलला संधी देऊ शकते. धूल संघाच्या गरजेप्रमाणे प्रदर्शन करू शकतो.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

राशिद खानने केला ड्रीम हॅट्रिकचा खुलासा, विराट, बाबरसह ‘या’ फलंदाजाला करायचंय बाद

आयपीएल सुरू असतानाच एमएस धोनी का मागवतोय २ हजार कडकनाथ कोंबड्या? जाणून घ्या कारण

अन् ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नने बड्डे बॉय सचिनचा घेतला ऑटोग्राफ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---