Monday, May 16, 2022
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल सुरू असतानाच एमएस धोनी का मागवतोय २ हजार कडकनाथ कोंबड्या? जाणून घ्या कारण

आयपीएल सुरू असतानाच एमएस धोनी का मागवतोय २ हजार कडकनाथ कोंबड्या? जाणून घ्या कारण

April 24, 2022
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
MS-Dhoni-And-Kadaknath

Photo Courtesy: Twitter/IPL


भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन करत आहे, तर दुसरीकडे त्याचे शेती आणि प्राणीमात्रांवरील प्रेम नेहमीच दिसत आले आहे. अशातच आता धोनीने मध्यप्रदेशमधून त्याच्या रांची स्थित शेतात २००० कडकनाथ कोंबड्या मागवल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

मध्यप्रदेश स्थित एका सहकारी फार्मने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याने दिलेली ही ऑर्डर पूर्ण केली आहे. मोठ्या प्रमाणात प्रोटीनची मात्रा असलेल्या कडकनाथ जातीच्या २००० कोंबड्या, झारखंडमधील रांची स्थित धोनीच्या शेतात पाठवल्या गेल्या आहेत. मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्याच्या कडकनाथ कोंबड्यांना छत्तीसगडसोबत मोठ्या कायदेशीर लढाईनंतर २०१८मध्ये जीआय टॅम मिळाला होता. या कोंबड्यांची अंडी आणि मांस इतर प्रजातीच्या कोंबड्यांपेक्षा जास्त किमतीत विकले जाते.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

झाबुआ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सोमेश मिश्रा यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, धोनीने एका स्थानिक सहकारी फार्मला २००० कडकनाथ कोंबड्यांची ऑर्डर दिली होती, ज्या एका वाहनातून रांचीला पाठवल्या गेल्या आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले की, “हे एक चांगले पाऊल आहे की, धोनीसारख्या स्टार खेळाडूने कडकनाथ कोंबडीच्या प्रजातीत रूची दाखवली आहे. कोणीही ऑनलाईन ऑर्डर करू शकते. जेणेकरून ज्या प्रजातीच्या कोंबड्या पाळणाऱ्या आदिवासी लोकांना फायदा होईल.”

झाबुआ जिल्ह्याच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख आय एस तोमर म्हणाले की, धोनीने काही काळापूर्वी ही ऑर्डर दिली होती. परंतु बर्ड फ्लूचा प्रसार झाल्यामुळे कोंबड्या पाठवता आल्या नाहीत. धोनीने विनोद मेदा यांना ही ऑर्डर दिली होती. मेदा झाबुआ जिल्ह्यातील रुडीपाडा गाता कडकनाथ कोंबड्यांची एक सहकारी संस्था चालवतात. मेदा म्हणाले की, झाबुआची आदिवासी संस्कृतीचे प्रतिक बान देखील धोनीला पाठवला जाणार आहे.

दरम्यान, धोनी सध्या त्याची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे. आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आणि रवींद्र जडेजावर ही जबाबदारी सोपवली. परंतु फलंदाजाच्या रूपात तो चांगले प्रदर्शन करत आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! मुंबईच्या माजी खेळाडूने वयाच्या ४०व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास

साहाला धमकावणं पत्रकार मुजूमदारला भोवले, लागणार २ वर्षांची बंदी; आयसीसीतूनही ब्लॅकलिस्ट करण्याची तयारी

‘कोणताही खेळाडू असू द्या, वाईट काळातून…’, आरसीबीच्या प्रशिक्षकांनी मान्य केला कोहलीचा खराब फॉर्म


ADVERTISEMENT
Next Post
Rashid-Khan

राशिद खानने केला ड्रीम हॅट्रिकचा खुलासा, विराट, बाबरसह 'या' फलंदाजाला करायचंय बाद

Aamir-Khan

आमिर खानला हवीये आयपीएलमध्ये संधी, बॅटिंग पाहून तुम्हीच ठरवा मिळेल की नाही

marco-jansen

ना फाफ, ना विराट, मला तर 'या' पठ्ठ्याला बाद करताना आली मजा; सामनावीर बनल्यानंतर यान्सिनचं वक्तव्य

Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.