मंगळवारी (16 मे) मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईला शेवटच्या षटकात 11 धावा हव्या होत्या. पण मोहसिन खान याने मुंबईला हा सामना जिंकू दिला नाही. मुंबई इंडियन्सला 8 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
शेवटच्या 12 चेंडूंवर मुंबई इंडियन्सला 30 धावा हव्या होत्या. यावेळी स्ट्राईकवर कॅमरून ग्रीन आणि टिम डेविड होते. 19व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नवीन उल हक याने ऑफ कटर चेंडू टाकला, ज्यावर डेविडने जबरदस्त षटकार मारला. त्याने तिसऱ्या चेंडूवर डेविडने पुन्हा दोन धावा घेतल्या. पुढचा चेंडू नवीनने नो बॉल टाकला आणि मागच्या बाजूला चौकार देखील गेला. या चेंडूवर मुंबईला एकूण 5 धावा मिळाल्या. षटकातील चौथा आणि पाचवा चेंडू निर्धाव राहिला. पण शेवटच्या चेंडूवर डेविडने पुन्हा एक षटकार मारला. अशा प्रकारे शेवटच्या षटकात मुंबईला 11 धावा हव्या होत्या. 19व्या षटकात नवीनने एकूण 19 धावा खर्च केल्या.
शेवटच्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर प्रत्येकी एक-एक धाव मुंबईच्या फलंदाजांनी घेतल्या. शेवटच्या तीन चेंडूंवर मुंबईला 9 धावा हव्या होत्या. मात्र, डेविड आणि ग्रीन हे लक्ष्य गाठू शकले नाहीत. षटकातील चौथा चेंडू पुन्हा निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर ग्रीनने एक, तर शेवटच्या चेंडूवड डेविड 2 धावा करू शकला. मुंबईला या सामन्यात विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य मिळाले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. रोहित आणि ईशानमध्ये पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी झाली. रोहितने 25 चेंडूत 37 धावा केल्या. तर ईशान किशनने 39 चेंडूत 59 धावा केल्या. मागच्या सामन्यात मुंबईसाठी शतक ठोकणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात मात्र 9 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. नेहाल वढेराने 17, तर विष्णू विनोद याने 2 धावा करून विकेट गमावली. टिम डेविडने 19 चेंडूत 32* तर कॅमरून ग्रीनने 6 चेंडूत 4 धावा केल्या.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 20 षटकांमध्ये लखनऊने 3 बाद 177 धावा केल्या. मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) याने सर्वाधिक 89 धावांची नाबाद खेळी केली. स्टॉयनिसने 47 चेंडू खेळले असून 4 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने या धावा केल्या. सोबतच लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्या () याने 42 चेंडूत 49 धावांचे योगदान दिले. मुंबईच्या गोलंदाजी विभागात जेसन बेहरनडॉर्फ याने चार षटकात 30 धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या. तर पियुष चावलाने 3 षटकात 26 धावा देत 1 विकेट घेतली. (Lucknow Super Giants won by 8 runs against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी20 संघातून होणार विराट-रोहित अन् राहुलची हाकालपट्टी’, भारताच्या माजी दिग्गजाचा खळबळजनक दावा
‘ती’ घटना घडताच मुंबईच्या चाहत्यांचा जीव पडला भांड्यात, जमिनीवर कोसळताच नवीन ‘पोलार्ड’ दुखापतग्रस्त