---Advertisement---

MI vs LSG: मुंबई इंडियन्सचा पराभव करत लखनऊ सुपर जायंट्सने 12 धावांनी सामना जिंकला

On: शुक्रवार, एप्रिल 4, 2025 11:35 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील 16 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स संघाने 12 धावांनी जिंकला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि लखनऊला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानंतर लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 203 धावा केल्या होत्या. तसेच मुंबईला जिंकण्यासाठी 204 धावांचं आव्हान दिलेल होत.

मुंबईसाठी खेळताना सर्वोत्तम धावा सूर्यकुमार यादवने केल्या त्याने 43 चेंडूत 67 धावा केल्या. त्यानंतर नमन धीरने 24 चेंडूत 46 धावांची शानदार पारी खेळली. तिलक वर्माने 23 चेंडूत 25 धावा तसेच हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 28 धावा केल्या, मात्र मुंबई संघ सामना जिंकू शकला नाही. लखनऊने त्यांना 12 धावांनी पराभूत केले.

लखनऊच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत मुंबईच्या फलंदाजांना प्रभावी कामगिरी करू दिली नाही. लखनऊसाठी शार्दुल ठाकूर, आकाशदीप, आवेश खान, तसेच दिग्वेश राठीने एक-एक विकेट घेतली.

लखनऊसाठी प्रथम फलंदाजी करताना सर्वाधिक धावा मिचेल मार्शने केल्या. त्याने 31 चेंडूत 60 धावा केल्या. ज्यामध्ये 9 चौकार, 2 षटकार झळकावले. तसेच एडन मारक्रमने 38 चेंडूत 53 धावा केल्या. बडोनीने 19 चेंडूत 30 धावा केल्या तर डेविड मिलर 14 चेंडूत 27 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आजही 2 धावांवरच परत गेला.

मुंबईसाठी सर्वाधिक शानदार गोलंदाजी हार्दिक पांड्याने केली त्याने 4 षटकात 36 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. तसेच बोल्ट, अश्वनी कुमार, विघ्नेश यांनी एक- एक विकेट्स घेतल्या.

लखनऊ संघाचा पुढचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 8 एप्रिल रोजी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---