आयपीएल 2023 चा हंगाम अखेरीकडे जात असतानाच विजेतेपदाचे दावेदार मानले जात असलेल्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. लखनऊचा कर्णधार केएल राहुल हा मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित हंगामासह जून महिन्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातूनही बाहेर झाला आहे. त्याने स्वतः इंस्टाग्राम पोस्ट करत याबाबत माहिती दिली.
https://www.instagram.com/p/Cr22wbHL9MP/?igshid=YmMyMTA2M2Y=
चालू आयपीएल हंगामात लखनऊ संघाचे नेतृत्व करत असलेल्या राहुलला आरसीबी विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो थेट अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. चेन्नई विरुद्धच्या सामन्यातून त्याने माघार घेतलेली. त्यानंतर तो बऱ्याच काळासाठी मैदानाबाहेर जाणार अशी शक्यता वर्तवली जात होती. त्याने आपल्या दुखापतीविषयी माहिती देताना एक इंस्टाग्राम पोस्ट केली. त्याने लिहिले,
’मेडिकल टीमच्या सल्ल्यानंतर मी माझ्या मांडीचे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उर्वरित आयपीएल तसेच पुढील महिन्यात ओव्हलवर होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मी खेळणार नाही. लवकरात लवकर पुनरागमन करण्याचा माझा प्रयत्न असेल. मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.’
राहुलच्या नेतृत्वात लखनऊ संघ या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसला आहे. लखनऊ संघाने आपली कामगिरी दर्जेदार ठेवत पहिल्या तीन क्रमांकातील आपले स्थान सोडले नाही. राहुलने या हंगामात नऊ सामने खेळताना 274 धावा केल्या होत्या. त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू कृणाल पंड्या संघाचे नेतृत्व करेल.
(Lucknow Supergiants Captain KL Rahul Ruled Out From IPL 2023 And WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विस्फोटक रसेलचा भीमपराक्रम! टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच खेळाडू
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच