आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स यांच्या दरम्यान सोमवारी (10 एप्रिल) सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 212 धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊच्या फलंदाजांनी तसाच आक्रमक खेळ दाखवला. निकोलस पूरनने चिन्नास्वामी स्टेडियमवर अक्षरशा वादळ आणत 15 चेंडूंवर अर्धशतक झळकावले. हे आयपीएल इतिहासातील दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले.
𝗣𝗿𝗼𝗹𝗶𝗳𝗶𝗰 𝗣𝗢𝗢𝗥𝗔𝗡!
This has been a sensational knock in the chase from the @LucknowIPL batter 🫡
Follow the match ▶️ https://t.co/76LlGgKZaq#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/L5MnJsH56K
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ संघाला मार्कस स्टॉयनिसने पुनरागमन करून दिले होते. तो बाद झाल्यानंतर संग अडचणी सापडेल अशी परिस्थिती झाली. मात्र, निकोलस पूरन याने काही चेंडूंमध्ये संघाचे नशीब पालटले. त्याने अवघ्या 15 चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले. यामध्ये 3 चौकार व 6 षटकारांचा समावेश होता.
पूरन हा आयपीएल इतिहासात दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने युसुफ पठाणची बरोबरी केली. पठानने 2014 मध्ये केकेआरसाठी खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 चेंडूंवर अर्धशतक झळकावलेले. या यादीमध्ये पहिल्या स्थानी लखनऊचा कर्णधार केएल राहुल व पॅट कमिन्स हे आहेत. राहुलने पंजाबचे प्रतिनिधित्व करताना 2018 मध्ये दिल्ली विरुद्ध 14 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलेले. तर, कमिन्सने मागील हंगामात केकेआरसाठी खेळताना मुंबईविरूद्ध 14 चेंडूवर हा कारनामा केला होता.
(Lucknow Supergiants Nicholas Pooran Smash 15 Balls Half Century Against RCB Second Fastest In IPL History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकमेवाद्वितीय विराट! लाजवाब अर्धशतकासह कोहलीने रचला आयपीएलमध्ये इतिहास, तो दुर्मिळ विक्रम नावे
चिन्नास्वामीचा ‘महाराजा’ बनला विराट! टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठा पराक्रम केला नावावर