आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये दोन नवीन फ्रेंचायजी सहभाग घेणार आहेत. या दोन फ्रेंचायझींची नावे लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स अशी आहेत. दोन्ही संघांनी मेगा लिलावात त्यांच्या गरजेनुसार खेळाडूंना विकत घेतले आहे आणि स्पर्धेत चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असतील. लखनऊ सुपर जायंट्सने अशात एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या संघातील दोन महत्वाचे युवा खेळाडू डान्स करत आहेत.
शक्यतो स्वतःच्या चालीवर विरोधी संघातील खेळाडूंना नाचवणारा वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) आणि युवा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) या व्हिडिओमध्ये डान्स करतना दिसत आहे. व्हिडिओ हार्डी संधूचे गाणे ‘बिजली बिजली’ यावर बनवला गेला आहे. आवेश खान आणि वेंकटेश अय्यर यांच्याव्यतिरिक्त व्हिडिओत अजून एक तिसरा व्यक्तिही दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लखनऊ सुपर लायंट्सने लिहिले की, “एकदम बिजली पफॉर्मंस.”
https://www.instagram.com/reel/CahnZQvDrw3/?utm_medium=copy_link
दरम्यान, आवेश खान आणि वेंकटेश अय्यर या दोघांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच खेळल्या गेलेल्या टी२० मालिकेत दोघांनी सहभाग घेतला होता. वेंकटेश अय्यरला मालिकेतील तिन्ही सामने खेळण्याची संधी मिळाली, तर आवेश खान शेवटच्या टी२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग बनला होता.
आयपीएलचा विचार केला तर, वेंकटेश अय्यर त्याची जुनी फ्रेंचायझी कोलकाना नाइट रायडर्सनमध्ये कायम आहे. मागच्या हंगामात वेंकटेश अय्यरने आयपीएल पदार्पण केले होते आणि स्वतःच्या जबरदस्त प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष देखील वेधले होते. केकेआरला आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात वेंकटेशची भूमिका महत्वाची राहिली होती. याच पार्श्वभूमीवर मेगा लिलावापूर्वीच संघाने त्याला ८ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. तर मागच्या हंगामात केकेआरने त्याला बेस प्राइस २० लाखात विकत घेतले होते.
तर दुसरीकडे आवेश खानला मेगा लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने तब्बल १० कोटी खर्च करून विकत घेतले. मेगा लिलावात त्याच्यावर लखनऊव्यतिरिक्त मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद या संघांनीही बोली लावली होती. परंतु अखेरीस लखनऊने बाजी मारली आणि गुणवंत गोलंदाजाला संघात सामील केले. मागच्या हंगामात आवेश दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला होता आणि या संघानेही त्याच्यावर मेगा लिलावात बोली लावली होती.
महत्वाच्या बातम्या –