आयपीएल 2023 मध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची मालिका सुरूच आहे. नुकताच लखनऊ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुल हा मांडीच्या दुखापतीमुळे आयपीएल तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. आता उर्वरित हंगामासाठी त्याच्या जागी लखनऊने दुसऱ्या खेळाडूला पाचारण केले. भारतीय क्रिकेट संघासाठी कसोटी इतिहासात त्रिशतक ठोकणारा केवळ दुसरा फलंदाज असलेल्या करूण नायर याला ही संधी मिळाली. लखनऊ सुपरजायंट्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची घोषणा केली.
Error 303: New player found ???? pic.twitter.com/U5mQLlZNbC
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 5, 2023
लखनऊचा कर्णधार केएल राहुल याला आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात अकराव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला. त्यानंतर त्याने सर्व तपासण्या केल्यानंतर आपण खेळण्यासाठी उपलब्ध नसणार याची स्वतः घोषणा केली. पुढील महिन्यात होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही तो दिसणार नाही. त्यामुळे लखनऊने त्याच्या जागी करूण याला संधी देण्याचा निर्णय घेतला.
करूण हा राहुलचा बालपणीचा मित्र मानला जातो. त्याने भारतीय संघासाठी 6 कसोटी सामने खेळलेले. यामध्ये त्याने एक विक्रमी त्रिशतक देखील झळकावले होते. यापूर्वी आयपीएलमध्ये त्याने चार संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. आरसीबी, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स व केकेआर या संघांचा तो भाग राहिला आहे. आतापर्यंत आयपीएल कारकीर्दीत त्याने 76 सामने खेळताना 1496 धावा केल्या आहेत. यावर्षी आयपीएल लिलावात त्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती.
(Lucknow Supergiants Sign Karun Nair As KL Rahul Replacement For Remainder Of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रवी शास्त्रींनी व्यक्त केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या भविष्याबाबत चिंता, म्हणाले, “फुटबॉलसारख्या लीग…”
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच






