क्रिकेटचे भवितव्य धोक्यात अशा प्रकारची काही धक्कादायक विधाने माजी क्रिकेटपटू करत आहे. वाढत्या टी२० लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरत आहे, असल्याचे त्यांनी म्हटलेले. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी क्रिकेटच्या भविष्याबद्दल पुन्हा एकदा आपले मत व्यक्त केले आहे.
रवी शास्त्री यांनी काही महिन्यांपूर्वीच वनडे क्रिकेटचे भवितव्य धोक्यात असल्याचे म्हटले होते. अनेक दिग्गज क्रिकेटपटू टी20 क्रिकेट खेळण्यासाठी आपला देश सोडतील असा इशारा त्यांनी दिला होता. आपल्या त्याच शब्दांचा त्यांनी पुनरुच्चार केला. एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“मी नेहमी बोलत आहे की, द्विपक्षीय मालिकांचे भवितव्य धोक्यात आहे. जगभरात ज्या पद्धतीने लीग क्रिकेटचा प्रसार होतोय, त्यावरून असेच वाटते. आता क्रिकेट फुटबॉलच्या दिशेने चाललेय.”
मागील वर्षी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट व जिमी निशाम यांनी राष्ट्रीय करार न स्वीकारता लीग क्रिकेट खेळण्याला प्राधान्य दिले होते. तसेच इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याने अकाली वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली. तसे दक्षिण आफ्रिकेच्या ही काही क्रिकेटपटूंनी निवृत्ती स्वीकारातील क्रिकेट खेळायला प्राधान्य दिलेले.
सध्या जगभरातील सर्वच प्रमुख देशांमध्ये टी20 लीग खेळली जाते. भारतात आयपीएल, पाकिस्तानात पीएसएल, ऑस्ट्रेलिया बिग बॅश व वेस्ट इंडीजमध्ये कॅरेबियन प्रीमियर लीग या स्पर्धा खेळल्या जातात.. त्या व्यतिरिक्त आता दक्षिण आफ्रिका, श्रीलंका तसेच युएईत खेळाडूंना मोठ्या रकमा मिळवून देणाऱ्या लीग सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक खेळाडू लवकर निवृत्त होत जगभरात या लीग खेळताना दिसतात.
(Ravi Shastri Again Talk About Future Of Cricket Due To T20 League)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: केएल राहुल आयपीएलसह WTC फायनलमधून बाहेर! इंस्टा पोस्ट करत स्वतः दिली माहिती
भुवीने बॅट घेतली की सनरायझर्सचा पराभव फिक्स! आकडेवारी पाहून घालाल तोंडात बोटे






