आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (4 मे) सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चाहत्यांना पुन्हा एकदा अखेरच्या षटकाचा थरार पाहायला मिळाला. हैदराबादला अखेरच्या षटकात 9 धावा बनवण्यात अपयश आले. त्याचवेळी संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याच्याबाबत एक समोर येत आहे.
विजयासाठी मिळालेल्या 172 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्सचे आघाडीचे चार फलंदाज केवळ 54 धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर ऐडन मार्करम व हेन्रिक क्लासेनने 70 धावांची भागीदारी करत यजमान संघाला सामन्यात आणले. त्यानंतर लागोपाठ बळी गेल्याने हैदराबाद संघ पुन्हा माघारला गेला. अब्दुल समद व भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. मात्र, वरूण चक्रवर्तीला अखेरचे षटक देण्याचा मोठा निर्णय नितीश राणा याने घेतला. हा निर्णय योग्य ठरवत त्याने संघाला पाच धावांनी विजय मिळवून दिला.
प्रामुख्याने गोलंदाज म्हणून संघात असलेला उपकर्णधार भूवनेश्वर कुमार हा नाबाद राहिला. मात्र, यासोबतच आयपीएल इतिहासातील एक खराब कामगिरीची नोंद देखील त्याच्या नावे जमा झाली. भुवनेश्वर कुमार यांनी हैदराबाद संघ धावांचा पाठलाग करत असताना 34 वेळा फलंदाजीला आला आहे. आणि या प्रत्येक वेळी संघाला पराभूतच व्हावे लागले. केकेआरविरुद्ध तो पाच धावांवर नाबाद राहिला.
या हंगामात भुवनेश्वरच्या गोलंदाजीचा विचार केल्यास, तो नऊ सामन्यांमध्ये आठ बळी घेण्यात यशस्वी ठरला. दुसरीकडे त्याच्या संघाची कामगिरी मात्र घसरली असून, आता उर्वरित प्रत्येक सामन्यात त्यांना विजय मिळवणे अनिवार्य आहे.
(When Bhuvneshwar Kumar Having Batting For SRH In IPL While Chasing Every Time Sunrisers Hyderabad Lost)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विस्फोटक रसेलचा भीमपराक्रम! टी20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसराच खेळाडू
विराटला ठोठावलेला 1.07 कोटींचा दंड, पण पठ्ठ्या एक रुपड्याही नाही देणार; RCB उचलणार खर्च! कारण वाचाच