मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर मंगळवारी (१९ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स संघ आमने सामने येणार आहेत. उभय संघांमध्ये आयपीएळ २०२२चा ३१वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकत दोन्ही संघांकडे गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचण्याची संधी असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी उभय संघांमध्ये नाणेफेक झाली असून लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
या सामन्यासाठी बेंगलोरने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कसलाही बदल केलेला नाही. दुसरीकडे लखनऊ संघाने त्यांच्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कसलाही बदल केलेला नाही.
#LSG have won the toss and they will bowl first against #RCB.
Live – https://t.co/9Dwu1D2dHE #LSGvRCB #TATAIPL pic.twitter.com/yt6MktHPyt
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2022
असे आहेत दोन्ही संघ-
लखनऊ सुपरजायंट्स (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, दुष्मंथा चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षल पटेल व्हर्जन २.०! आरसीबीच्या गोलंदाजाचा नवा अवतार, सरावादरम्यान मारला ‘नो लूक सिक्स’
केकेआरच्या खेळाडूला जोराने डोक्यावर लागला चेंडू, पाहून चहलच्या हृदयाची वाढली धडधड; केली विचारपूस