---Advertisement---

SRH vs LSG: नाणेफेक लखनऊच्या पारड्यात; संघात स्टार खेळाडूची एंट्री!

---Advertisement---

आयपीएल 2025 मधील सातवा सामना आज (27 मार्च) रोजी खेळला जात आहे. हा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगत आहे. सनराझर्सच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळल्या जात आसलेल्या या सामन्यात लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हन बद्दल बोलायचे झाल्यास, लखनऊच्या संघात एक बदल करण्यात आला आहे, शाहबाज अहमदच्या जागी आवेश खानला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हन-

लखनऊ सुपर जायंट्स: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी, प्रिन्स यादव

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत दोन्ही संघ 4 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. ज्यात लखनऊ सुपर जायंट्सने सनरायझर्स हैदराबादला 3 वेळा हरवले आहे. तर सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध फक्त 1 वेळा विजय मिळवला आहे. अशाप्रकारे, जुन्या रेकॉर्डवरून हे स्पष्ट होते की लखनऊ सुपर जायंट्स सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मजबूत राहिले आहेत. पण आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणे रंजक ठरेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---