इंग्लंड पुरूष क्रिकेट संघाने नुकतेच दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. त्यातच या संघामध्ये आणखी मोठी भर पडणार आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू ल्युक राईट याच्यावर इंग्लंड क्रिकेट बोर्डने (ईसीबी) नवी जबाबदारी सोपवली आहे. तो आता पुरूष संघाच्या निवड समितीचा भाग बनला आहे. सध्या तो ऑकलंडसोबत असून तेथिल जबाबदारी पूर्ण झाल्यावर पुढील वर्षी मार्च महिन्यात तो हे पद सांभाळणार आहे.
ल्यूक राईट (Luke Wright) इंग्लंडच्या सर्व पुरुष संघांच्या निवडींमध्ये सहभागी असणार आहे. तो कसोटी आणि मर्यादित षटकांच्या संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार, इंग्लंडचे पुरुष व्यवस्थापकीय संचालक रॉब की, परफॉर्मन्स डायरेक्टर मो बॉबॅट आणि प्लेयर आयडी लीड डेविड कोर्ट यांच्यासोबत सामायिकपणे निवडीची जबाबदारी सांभाळणार आहे.
ईसीबीने त्यांच्या केंद्रीय कराराबाबत विचार करत राईटला निवडण्याचा विचार केला आहे. याबाबत राईट म्हणाला, “ही भूमिका साकारणे हा एक मोठा सन्मान आणि विशेषाधिकार आहे. ज्याबद्दल मी उत्सूक आहे. पुढील वर्षी ऍशेस आणि आयसीसी पुरुषांच्या वनडे विश्वचषकासह, मी सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही आणि इंग्लंडच्या पुरुष क्रिकेटसाठी हे विलक्षण वर्ष ठरल्यानंतर योगदान देण्याचा प्रयत्न मी करेल.”
राईटने 2004 मध्ये ससेक्समध्ये सामील होण्यापूर्वी लीसेस्टरशायर येथे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तो 2007 आणि 2014 दरम्यान इंग्लंडकडून 100 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. तसेच तो 2010 मध्ये आयसीसी पुरुषांचा टी20 विश्वचषक जिंकलेल्या संघाचा भाग राहिला. त्याचबरोबर तो बिग बॅश लीग, इंडियन प्रीमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगसह परदेशी लीगमध्येही खेळला.
Introducing our new Men's Selector, @lukewright204 🤝
— England Cricket (@englandcricket) November 22, 2022
राईट सध्या ऑकलंड क्रिकेटमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि इंग्लिश हंगामाच्या सुरुवातीस तयार असलेल्या मार्चच्या अखेरीस इंग्लंडच्या निवडकर्त्याची भूमिका सुरू करण्यापूर्वी तो तेथे आपला वेळ संपवेल. Luke Wright has been appointed England Men’s Selector
निवड समितीचा सदस्य होण्यासाठी राईटने नुकतेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने टी20 क्रिकेटमध्ये 344 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 7 शतकांसह 8526 धावा केल्या असून 79 विकेट्सही घेतल्या आहेत. नाबाद 153 ही त्याची टी20मधील सर्वोच्च खेळी ठरली. त्याने आयपीएलमध्ये पुणे वॉरियर्स आणि बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न स्टारकडून सामने खेळले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डने ‘या’ दिग्गजालाही केले क्लीन बोल्ड, हिसकावून घेतला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट
अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पाहा कसे