---Advertisement---

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर एम अश्विनने काढली स्वर्गीय आईची आठवण, लिहली भावनिक पोस्ट

On: मंगळवार, फेब्रुवारी 2, 2021 4:17 PM
---Advertisement---

तामिळनाडूचा फिरकीपटू एम अश्विनने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) एका महिन्यापूर्वी आराजामुळे मृत्यू झालेल्या आपल्या दिवंगत आईला समर्पित केली आहे. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकण्यात तामिळनाडूचा फिरकीपटू एम अश्विनने महत्वपूर्वक भूमिका बजावली होती. तमिळनाडूने अंतिम सामन्यात बडोद्याला सात गडी राखून पराभूत केले आणि दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद काबीज केले.

हे पदक जिंकल्यानंतर अश्विनला आपल्या दिवंगत आईची आठवण झाली व त्याने ट्रॉफी आपल्या दिवंगत आईला समर्पित केली. त्याने आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भात खूप भावनिक पोस्ट लिहिली आहे. अश्विनच्या आईला क्रिकेटची फार आवड असल्याने त्याने क्रिकेट क्षेत्र निवडले असल्याचे त्याने सांगितले आहे.

अशा भावनिक शब्दात अश्विन झाला व्यक्त

अश्विनने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एका महिन्यापूर्वी माझ्या आईचे मेलोईड ल्युकेमियामुळे निधन झाले. तिची अवस्था अत्यंत नाजूक होती आहे दुर्दैवाने ती आम्हाला सोडून गेली. माझ्या आईला क्रिकेटची खूप आवड होती त्यामुळेच मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मी लहान असताना तिने मला एक डझन टेनिस बॉल आणि रबर बॉल विकत घेऊन दिले होते. त्यामुळे मला क्रिकेटमध्ये रस निर्माण होत गेला आणि हळूहळू या खेळामध्ये माझी आवड वाढत गेली. माझ्या आईने मला सरावासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी शाळेमध्ये येऊन तशी परवानगी मिळवली होती. त्यामुळे ती मला आठवड्याच्या शेवटी मी खेळत असताना मला बघायला येत असे.”

पुढे त्याने असे लिहिले आहे की, “आईने मला एक चांगली क्रिकेट किटसुद्धा खरेदी करून दिली होती. सर्वांचा स्वयंपाक बनवण्यासाठी ती रोज सकाळी चार वाजता उठायची आणि सात वाजता ऑफिसला जायची. पुन्हा रात्री सात वाजता ऑफिसमधून घरी यायची आणि परत सर्वांसाठी स्वयंपाकात व्यस्त राहायची. ती माझी नंबरवन चाहती होती आणि समालोचक देखील होती. नेहमीच मी चांगली कामगिरी करावी अशी तिची इच्छा होती.”

“आईच्या निधनानंतर मला ज्यावेळी तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करायला जायचे होते. त्यावेळी मी प्रचंड गोंधळून गेलो होतो. त्यावेळी माझे वडील, माझी पत्नी आणि बहिणीने मला सांगितलं की, मी या स्पर्धेमध्ये खेळलं पाहिजे आणि चांगलं काम केलं पाहिजे. कारण यामुळे माझ्या आईला सर्वात जास्त आनंद मिळेल आणि ही ट्रॉफी आईच्या नावावर समर्पित असेल. जेव्हा मी मैदानात खेळायला उतरेन; तेव्हा मी मनापासून आईला लक्षात ठेवेन. मी नेहमी चांगली कामगिरी करुन माझा संघ जिंकवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आईला माझा फार अभिमान वाटला असेल की, आम्ही ही स्पर्धा जिंकली. तसेच मी तामिळनाडू संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलो,” असे त्याने शेवटी लिहिले आहे.

https://www.instagram.com/p/CKud34mrxF3/?utm_source=ig_web_button_share_sheet

अश्विनची आयपीएलमधील कामगिरी

एम अश्विन हा आयपीएल मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब या संघात खेळत असून चांगली कामगिरी केली आहे. २०१६ च्या आयपीएल लिलावात राइजिंग पुणे सुपरजायंट्स संघाने त्याला ४.५ करोड मध्ये विकत घेतले होते. त्यानंतर त्याने ३१ आयपीएल सामने खेळले आहेत. यादरम्यान २५ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ‘ती’ गोष्ट कधीही विसरू शकणार नाही”, अजिंक्य रहाणेचा खुलासा

वाढदिवस विशेष: १४० किलो वजन असलेला क्रिकेटर, ज्याचे विराट कोहलीने बदलले आयुष्य

“येत्या १० वर्षात शुबमन गिलचं नाव जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी सलामीवीरांमध्ये असेल”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---