भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना काही दिवसांपुर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात एंजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र लवकरच त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली होती. परंतु आता कपिल देव यांचा मृत्यू झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. कित्येक चाहत्यांनी तर ट्विटर, फेसबुक अशा माध्यमातुन त्यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.
कपिल देव यांच्या मित्राने सांगितले सत्य
पण हे वृत्त पुर्णपणे खोटे आहे. स्वत: कपिल देव यांचे जवळचे मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू मदन लाल यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी या अफवांवर पूर्णविराम लावत लिहिले की, “कपिल पाजींच्या आरोग्यासंदर्भात असे अनुमान असंवेदनशील आणि बेजबाबदार आहेत. दिवसेंदिवस कपिल यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तरीही कपिल यांचे कुटुंब त्यांच्या आरोग्याबाबत तणावात आहे. अशावेळी आपणही संवदेनशील बनण्याची गरज आहे.”
Speculation on a colleagues health and well being is insensitive and irresponsible. Our friend, Kapil Dev is on the path to recovery and getting better each day. At a time where the family has been through stress owing to his hospitalization, please let us be sensitive.
— Madan Lal (@MadanLal1983) November 2, 2020
कपिल यांनी शेअर केला होता व्हिडिओ
एवढेच नाही तर, रुग्णालयातुन बरे होऊन घरी परतल्यानंतर कपिल देव यांनी व्हिडीओद्वारे आपल्या स्वास्थाचे अपडेट दिले होते. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, “आता माझी तब्येत खूप चांगली आहे. माझ्या सर्व संघ सहकार्यांना पुन्हा भेटायला उत्सुक आहे. आपण लवकरच भेटण्याचा प्रयत्न करु. सोबतच चाहत्यांनाही माझ्या स्वास्थासाठी प्राथर्ना केल्यामुळे आभार.” तसेच आपल्या जिवनावर बनणाऱ्या ८३ या चित्रपटाचाही त्यांनी उल्लेख केला होता.
Good to have you back @therealkapildev Paaji .. Best wishes for your movie ✌️ pic.twitter.com/EoBkAoPefT
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 29, 2020
Layman Diary office: Bhut dukhad samachar Kapil Dev nahi raha. Shradhanjali 🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/Akk3b1PqrO
— Shambhu Sharan Singh (@shambhusingh21) November 2, 2020
#Kapildev Sir pic.twitter.com/UfqFP5QqVG
— இராவணனின் ரசிகன் (@UnknownRA1_twrt) November 2, 2020
I can’t believe it but that’s life friends.
RIP Kapil Dev the only gentleman of the cricket . pic.twitter.com/qH3pF3v2eq— Hisamuddin Khan (@Hisamud47588796) November 2, 2020
कपिल देव यांची क्रिकेट कारकिर्द
कपिल देव यांनी भारताकडून १९७९ चे १९९४ पर्यंत १६ वर्षे क्रिकेट खेळले. यात त्यांनी अनेक अविश्वसनीय खेळी केल्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अष्टपैलू कामगिरी करताना वनडेमध्ये २२५ सामन्यात २५३ विकेट्स आणि ३७८३ धावा केल्या आहेत, तर कसोटीमध्ये १३१ सामन्यात ४३४ विकेट्स आणि ५२४८ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘…म्हणून सर्वांना वाटलं मी निवृत्त होतोय’, ‘कॅप्टन कूल’ धोनीचे मोठे वक्तव्य
‘जे काही झाले, ते पचवणे खूप कठीण,’ प्लेऑफमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडू झाला भावुक
‘मी रिटायर होतेय’ अशा ट्विटने सिंधू चाहते गोंधळले, पाहा काय आहे प्रकरण
ट्रेंडिंग लेख-
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?
प्ले ऑफ अभी दूर नहीं! ३ जागा, ३ संघ आणि २ सामने; पाहा कशी आहेत प्लेऑफची समीकरणे
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे