---Advertisement---

बीसीसीआयच्या माजी सचिवांच्या भावाचे निधन, अष्टपैलू म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये उमटवला होता ठसा

On: सोमवार, जुलै 25, 2022 11:52 PM
---Advertisement---

मध्य प्रदेशच्या रणजी संघासाठी २०२२ चे वर्ष अविस्मरणीय असे राहिले आहे. कारण यावर्षी मध्य प्रदेश संघाने प्रतिष्ठित रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईला पराभूत करत जेतेपद पटकावले होते. मात्र मध्य प्रदेश संघाच्या या विजयाला एक महिनाही पूर्ण होत नाही, तोवर राज्य क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी पुढे आली आहे. मध्य प्रदेश संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू अशोक जगदाळे यांचे सोमवारी (२५ जुलै) निधन झाले आहे.

उजव्या हाताचे फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असलेले अशोक जगदाळे ७६ वर्षांचे होते. इंदोर येथे त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. अशोद जगदाळे यांची आणखी एक ओळख म्हणजे, ते बीसीसीआयचे माजी सचिव आणि निवड समितीचे माजी सदस्य संजय जगदाळे यांचे भाऊही होते. याच संजय जगदाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली आहे.

संजय जगदाळेंनी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना सांगितले की, “रविवारी रात्री अशोक जगदाळेंच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्यानंतर ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना त्वरित जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांच्या शरीरातील रक्तस्त्राव न थांबल्याने त्यांची प्रकृती ढासळली आणि डॉक्टरही त्यांचे प्राण वाचवू शकले नाहीत.”

https://twitter.com/ChouhanShivraj/status/1551461171902828546?s=20&t=mVhcs-ylfOmkXpy2dG1yOQ

अशोक जगदाळेंची कारकिर्द
अशोक जगदाळे हे मध्य प्रदेश संघाच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलूंपैकी एक राहिले आहेत. २० नोव्हेंबर १९४५ रोजी इंदोरमध्ये जन्मलेले अशोक जगदाळे यांनी १९६१-६२ हंगामात रणजी पदार्पण केले होते. पुढे जवळपास १८ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी ७६ प्रथम श्रेणी सामने खेळले. यादरम्यान त्यांच्या बॅटमधून ४ शतके निघाली. तसेच त्यांनी २९५४ धावाही केल्या होत्या. याखेरीज ते मध्यमगती गोलंदाजीही करत असायचे. त्यांनी प्रथम श्रेणीत १८२ विकेट्स घेतल्या होत्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

‘शेफर्डचा बाऊंसर, संजूची विकेटकिपींग अन् शाई होपचं शतक!’ पाहा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील रोमांचक क्षण

ब्रेकिंग! वाईट काळातून जात असलेल्या साहाला मिळाला बंगाल सरकारचा सर्वोच्च पुरस्कार

पहिल्या वनडेत सुसाट असलेल्या धवनच्या गाडीला दुसऱ्या सामन्यात लागला ब्रेक, रंगली एकच चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---