रणजी ट्रॉफी २०२१-२२चा मुंबई विरुद्ध मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya Pradesh) अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. अंत्यत चुरशीच्या या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकताना प्रथम फलंदाजी केली. त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद ३७४ धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असता मध्य प्रदेशने पहिल्या डावात खेळताना १०० पेक्षा अधिक धावांची भक्कम आघाडी घेतली आहे. यातच रणजी ट्रॉफीचे सर्वाधिक चॅम्पियन ठरलेल्या मुंबईच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदार याने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम गाळला आहे.
पाटीदारने झंझावाती शतकी खेळी केली आहे. या सामन्यात तो शतक ठोकणारा मध्य प्रदेशचा तिसरा फलंदाज ठरला आहे. यश दुबे (Yash Dubey) आणि शुभम शर्मा (Shubham Sharma) यांनी शतके ठोकत संघाला चांगली सुरूवात करून दिली. ते दोघे बाद झाल्यावर मुंबईच्या जीवात जीव आला. पण तो काही क्षणासाठीच, नंतर आलेल्या पाटीदारने उत्तम खेळ करत तिसऱ्या दिवशी अर्धशतकीय खेळी केली. चौथ्या दिवशीही ती लय कायम राखत १६३ चेंडूत शतक पूर्ण केले आहे.
दुबे आणि शर्मा यांच्यासाठी हा त्यांच्या कारकिर्दीतील रणजी ट्रॉफीचा पहिला अंतिम सामना आहे. दोघांनी यामध्ये मध्य प्रदेशसाठी २२२ धावांची भागीदारी केली. यशने ३३६ चेंडूत १४ चौकारांच्या मदतीने १३३ धावा केल्या. तर शुभमने २१५ चेंडूत १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११६ धावा केल्या. पाटीदारच्या शतकी खेळीने मध्य प्रदेशने ६ विकेट्स गमावत ४५०चा आकडा पार केला.
💯 for Rajat Patidar! 👏 👏
What a cracking knock this has been from the Madhya Pradesh right-handed batter in the #RanjiTrophy #Final! 👍 👍 @Paytm | #MPvMUM
Follow the match ▶️ https://t.co/xwAZ13U3pP pic.twitter.com/cftACdqt8T
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 25, 2022
पाटीदार १२२ धावा करत तुषार देशपांडेच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने २१९ चेंडू खेळताना २० चौकार लगावले आहेत. दुबे, शर्मा आणि पाटीदार यांनी संघाला भक्कम धावसंख्या उभारण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे. पाटीदारची विकेट पडली असता मध्य प्रदेशने सात विकेट्स गमावत ४८३ धावा केल्या आहेत.
मध्य प्रदेशने पहिल्यांदा १९९८-९९ च्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचली होती. तेथे त्यांना कर्नाटक संघाकडून पराभूत व्हावे लागले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सो क्यूट! खूप दिवसांनी पत्नीला भेटला सूर्यकुमार यादव, दिसताच मारली कडकडून मिठी- PHOTO
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाची विजयी अखेर, मात्र मालिका नावावर करत श्रीलंकेने रचला इतिहास
भारताविरुद्ध दोन हात करण्यास आयर्लंडचा संघ झाला सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असणार विशेष लक्ष