महाराष्ट्राच्या मुलांनी “३०व्या किशोर-किशोरी गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” मुलांच्या गटात विजयी सलामी दिली. महाराष्ट्राने ग गटात पॉंडेचरिचा ६७-०८ असा धुव्वा उडविला.मध्यांतराला ४३-०३ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील जोशात खेळ करीत हा विजय सोपा केला. पियुष पाटील, दीपक केवट, अमरसिंह कश्यप, राहुल वाघमारे यांना या विजयाचे श्रेय द्यावे लागेल.
इतर निकाल:
बिहार वि वि जम्मू-काश्मीर (६७-२१),
ओरिसा वि वि गोवा (४७-४३).
तसेच ३० व्या किशोर- किशोरी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली त्यात महाराष्ट्राचे दोन्हीं संघ ग गटात आहेत.
बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने दि. २१ ते २५ जाने.२०१९ या कालावधीत पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा येथे होणाऱ्या “३०व्या किशोर/किशोरी राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेकरिता आज गटवारी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राचे दोन्ही संघ ग (G) गटात असून मुलांच्या गटात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरांचल, पॉंडेचरी हे अन्य तीन संघ त्यांच्या गटात आहेत. तर मुलींच्या गटात महाराष्ट्रासह तामिळनाडू, उत्तरांचल हे अन्य दोन संघ त्यांच्या गटात आहेत.
गतवर्षी महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले होते. किशोर गटात २७ , तर किशोरी गटात २५ संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. या सहभागी संघाची आठ गटात विभागणी करण्यात आली आहे.आज या स्पर्धेची गटवारी तांत्रिक समितीचे अध्यक्ष जगदीश्वर यादव यांनी जाहीर केली. ती खालील प्रमाणे.
किशोर (मुले) गट :-
१) अ गट:- १)साई, २)चंदीगड, ३)तेलंगणा,
२) ब गट :- १)उत्तर प्रदेश, २)ओरिसा, ३)गोवा.
३)क गट :- १)तामिळनाडू, २)गुजरात, ३)केरळ.
४)ड गट :- १)मध्यप्रदेश, २)प.बंगाल स्टेट युनिट, ३)विदर्भ.
५)इ गट :- १)आंध्र प्रदेश, २)बिहार, ३)जम्मू-काश्मीर.
६)फ गट :- १)हरियाणा, २)पंजाब, ३)दिल्ली, ४)झारखंड.
७)ग गट :- १)महाराष्ट्र, २)राजस्थान, ३)उत्तरांचल, ४)पॉंडेचरी.
८)ह गट :- १)छत्तीसगढ, २)कर्नाटक, ३)हिमाचल प्रदेश, ४)आसाम.
किशोरी (मुली) गट :-
१)अ गट :- १)साई, २)ओरिसा, ३)विदर्भ.
२)ब गट :- १)हरियाणा, २)उत्तर प्रदेश, ३)झारखंड.
३)क गट :- १)बिहार, २)कर्नाटक, ३)केरळ.
४)ड गट :- १)छत्तीसगढ, २)आसाम, ३)गुजरात.
५)इ गट :- १)तेलंगणा, २)हिमाचल प्रदेश, ३)मध्यप्रदेश.
६)फ गट :- १)पश्र्चिम बंगाल स्टेट युनिट, २)पंजाब, ३)गोवा.
७)ग गट :- १)महाराष्ट्र, २)तामिळनाडू, ३)उत्तरांचल.
८)ह गट :- १)दिल्ली, २)आंध्रप्रदेश, ३)पॉंडेचरि, ४)राजस्थान.