---Advertisement---

कोरोनामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातून आयपीएलचे सामने ढकलणार पुढे?

On: बुधवार, मार्च 11, 2020 7:08 PM
---Advertisement---

चीननंतर संपूर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसने आता भारतात आपले पाऊल ठेवायला सुरुवात केली आहे. भारतात कोरोनाचे 60 रूग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर या व्हायरसचा फटका आता अनेक खेळांच्या स्पर्धांना बसत आहे. तसेच आता 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल 2020 च्या स्पर्धेवरही कोरोना व्हायरसमुळे टांगती तलवार आहे.

बीसीसीआय (BCCI) आपल्या प्रतिष्ठीत टी20 लीग आयपीएलचे वेळापत्रक जरी पुढे ढकलण्याच्या तयारीत नसली, तरी राज्य सरकारने हे वेळापत्रक पुढे ढकलण्याचा गंभीरतेने विचार करायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयपीएलचे सामने आपल्या राज्यातून पुढे ढकलण्याचा निर्णय घेईल. यावेळी 29 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलची सुरुवात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधून होणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची 5 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सरकारने या लीगच्या आयोजनावर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील आयोजित आयपीएल सामने पुढे ढकलण्यावर चर्चा होईल.

महाराष्ट्रातील आयपीएलची प्रमुख फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) त्यांच्या 7 घरच्या सामन्यांचे आयोजन मुंबई शहरात करायचे आहे. या व्यतिरिक्त स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजनही मुंबईतच करण्यात येणार आहे.

राज्य सरकार कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) संरक्षण करण्यासाठी कठोर पाऊले उचलत आहे. तसेच आयपीएलच्या या सामन्यांना पुढे ढकलण्याचा विचारही करत आहेत. यापूर्वी कर्नाटक सरकारने आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. तसेच आयपीएल यावर्षी रद्द करण्यात यावी यासाठी मद्रासच्या उच्च न्यायालयात जनयाचिका दाखल करण्यात आली आहे.

आयपीएलच्या आयोजनांवरून मीडियाने बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि अन्य अधिकाऱ्यांनाही अनेक प्रश्न विचारले होते.

तेव्हा बीसीसीआयकडून असे सांगण्यात आले होते की, बीसीसीआयचे अधिकारी कोरोना व्हायरसवर लक्ष ठेवून आहेत. परंतु देशातील या व्हायरसमुळे बीसीसीआयला स्पर्धा पुढे ढकलण्याची स्थिती वाटत नसल्याचे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिका ४ वर्षांनंतर भारत दौऱ्यावर; असा आहे भारत-द. आफ्रिका वनडे सामन्यांचा इतिहास

ऑस्ट्रेलियाचा हा दिग्गज घेतोय धोनीसारख्या फिनीशरचा शोध

चक्क झेल घेण्यासाठी यष्टीरक्षकाने धरले फलंदाजाचे पाय! पहा व्हिडिओ…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---