देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी या स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने बुधवारी (23 नोव्हेंबर) समाप्त झाले. त्यानंतर आता उपांत्यपूर्व तसेच उपउपांत्यपूर्व फेरीतील संघ निश्चित झाले आहे. महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत कमालीचे सातत्य दाखवत सर्व सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राने आपल्या अखेरच्या सामन्यात पॉंडेचेरी संघावर 105 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणे याने शानदार 184 धावांची खेळी केली.
रांची येथे झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलग तीन शतके ठोकलेल्या राहुल त्रिपाठीने या सामन्यातही आपलाच फॉर्म कायम राखला. त्याने 61 धावांची खेळी केली. तर, सातत्याने आक्रमक खेळ दाखवलेल्या अझीम काझीने 57 चेंडूंवर 88 धावा चोपल्या. ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करत असलेल्या अंकित बावणे याने या सामन्यात शतकी तडाखा दिला. 143 चेंडूंवर 28 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद 184 धावा काढल्या. या सर्वांच्या योगदानाच्या जोरावर महाराष्ट्राने 379 धावा उभारल्या.
या धावांचा पाठलाग करताना पारस डोगरा व अंकित शर्मा यांनी झुंज दिली. डोगराने 67 तर शर्माने 107 धावा केल्या. मात्र, पॉंडेचेरीचा डाव 7 बाद 274 पर्यंत मर्यादित राहिला. महाराष्ट्रासाठी मनोज इंगळे व सत्यजित बच्छाव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. महाराष्ट्राने ई गटात अव्वल स्थान पटकावत उपांत्यपूर्व फेरीत जागा बनवली आहे.
या स्पर्धेच्या नव्या प्रारूपानुसार पाच गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. तर, सरस धावगती असलेले अव्वल सहा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत आमने-सामने येतील.
(Maharashtra Entered In Quarter Finals Of Vijay Hazare Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जस्टीन लॅंगर यांचा पॅट कमिन्सवर हल्लाबोल; म्हणाले, ‘तो भित्रा असून माझ्यासमोर वेगळा वागत होता!’
वेंकटेश अय्यरचा खुलासा; म्हणाला, ‘त्यामुळे रोहित शर्मा गोलंदाजीची संधी देत नाही’