मुंबई। छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेच्या अनुदानात भरघोस वाढ केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे कार्यकारणी सदस्य व क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांच्यावतीने अजितदादा पवार यांना आज राष्ट्रवादी भवन-मुंबई येथे पुष्पगुच्छ देऊन मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. शिवशाही चषक या नावाने या स्पर्धेला सुरुवात झाली. आज ती छत्रपती शिवाजी महाराज या नावाने प्रचलित आहे. (Maharashtra Finance Minister Announced 1 Crore Fund To Kabaddi)
महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रतिवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पंचवीस लाख रुपये अनुदान मिळणाऱ्या या स्पर्धेस अजितदादा (Ajit Pawar) अर्थमंत्री झाल्यावर पन्नास लाख रुपये अनुदान मंजूर करून घेतले. आज दादांनी त्यात भरघोस वाढ करून ते एक करोड रुपये करून घेतले व त्याची घोषणा केली. त्यामुळे क्रीडा जगतात आनंदाचे वातारण तयार झाले आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे मरगळ आलेल्या खेळाच्या जगतात या घोषणेमुळे उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
या निमिताने क्रीडाप्रेमी बाबुराव चांदेरे यांनी शासनाच्यावतीने थेट नियुक्त करण्यात येणाऱ्या खेळाडू कोठ्यातील फाईल प्रलंबित आहेत अशा ५४ खेळाडूंची यादी दादांना सादर केली व त्यावर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. त्यात सायली केरीपाळे, गिरीश इरणाक, रिशांक देवाडीगा, अभिलाषा म्हात्रे, सोनाली शिंगटे या कबड्डीच्या खेळाडू सोबत, उत्कर्ष काळे, मनीषा दिवेकर, सोनाली तोडणकर, कोमल गोळे हे कुस्तीचे व ११ खो-खो च्या खेळाडूंचा देखील सहभाग आहे.
चांदेरे यांच्या या विनंतीवरून दादांनी संबधित खात्याच्या सचिवांशी संपर्क साधून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्षात असून देखील दादांनी जागतिक महिला कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या महिलांना प्रत्येकी एक करोड रुपये बक्षीस दाखल मिळवून दिले होते. खेळ व खेळाडूंवर मनापासून प्रेम करणारे दादा, त्याच बरोबर दिलेला शब्द पाळणारे दादा खऱ्या अर्थाने लोकनेते आहेत. दादांच्या या निर्णयाने सर्वच क्रीडाक्षेत्रात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले असून आपल्या मागे आपली काळजी घेणारा व आपले हित पाहणारा एक नेता दादांच्या रूपाने आपल्या पाठीशी आहे. अशी खेळाडूंची भावना झाली आहे. कबड्डी वर्तुळात कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांच्या निधनानंतर एक पोकळी निर्माण झाली होती, पण दादा घेत असलेल्या खेळाडूंच्या हिताच्या निर्णयामुळे बुवांची ही पोकळी लवकर भरून निघेल असे कबड्डीप्रेमींना वाटू लागले आहे. उपरोक्त माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे कार्यकारणी सदस्य बाबुराव चांदेरे यांनी प्रसार माध्यमाकरिता एका पत्रकाद्वारे जाहीर केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटसाठी स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे ‘हे’ चित्र, पाहा नक्की काय आहे कारण
वॉर्नरची आयपीएलमधील ‘या’ विक्रमात विराट, शिखरशी बरोबरी, आता केवळ रैना आहे पुढे
‘खूपच निराशाजनक, धावा कमी केल्या आणि…’ कर्णधार सॅमसनने स्पष्ट केले राजस्थानच्या पराभवाचे कारण