मुंबईतील वांद्रे परिसरात क्रीडा संकुल विकसित करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) 2,000 चौरस मीटर जमीन भाडेतत्त्वावर देण्यास महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. हा भूखंड 1988 मध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इनडोअर ट्रेनिंग अकादमी स्थापन करण्यासाठी दिला होता. मात्र, त्यांना त्याचा वापर करता आला नाही.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अत्याधुनिक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी क्रिकेटपटू रहाणेला 30 वर्षांच्या भाडेतत्त्वावर जमीन देण्याच्या महसूल विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
हा भूखंड यापूर्वी गावसकर यांना इनडोअर क्रिकेट प्रशिक्षण अकादमी विकसित करण्यासाठी देण्यात आला होता. मात्र, त्यांनी या जागेवर कोणतेही बांधकाम केले नसल्याने, शासनाने हा भूखंड रहाणेला हस्तांतरित केला. या भूखंडाची दुरवस्था झाली असून, त्याचा वापर झोपडपट्टीवासी अयोग्य कामांसाठी करत आहेत. बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या रहाणेवर मोठी जबाबदारी आली आहे. सरकारने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला. सरकारने बरेच दिवस हे काम पूर्ण होण्याची वाट पाहिली होती. मात्र, गावसकर यांना ही जबाबदारी पार पाडता आली नाही. वर्षानुवर्षे अपूर्ण असलेले हे काम पूर्ण करण्याची रहाणेला संधी आहे. रहाणे सध्या फक्त देशांतर्गत क्रिकेट खेळतोय.
राहणे काही दिवसांपूर्वी इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला स्पर्धा अर्धवट सोडावी लागले. आता एक ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या इराणी ट्रॉफी स्पर्धेत तो मुंबई संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वात मुंबईने चालू वर्षी रणजी ट्रॉफी जिंकण्याचा मान मिळवला होता. रहाणे मागील वर्षीपासून भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच आता त्याचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन अशक्य असल्याचे अनेकांनी म्हटले. आगामी आयपीएल हंगामात देखील त्याला चेन्नई सुपर किंग्स रिटेन करण्याची शक्यता कमी आहे.
हेही वाचा-
“पंत उत्कृष्ट खेळाडू, तो ऑस्ट्रेलियासाठी खेळायला हवा होता”, मार्शकडून कौतुकाचा वर्षाव
रिषभ पंतची आरसीबीच्या कर्णधारपदावर नजर? यष्टीरक्षकाने सर्वकाही खरं सांगून टाकलं
21व्या शतकातील भारताची सर्वोत्तम कसोटी इलेव्हन, रोहित-धोनी सारख्या अनेक दिग्गजांना मिळाली नाही जागा!