---Advertisement---

Maharashtra Kesari | पैलवान बाला रफिक शेख याचा धक्कादायक पराभव, विशाल बनकरची १३-३ ने एकतर्फी मात

On: शुक्रवार, एप्रिल 8, 2022 4:50 PM
Bala-Rafik
---Advertisement---

साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलमध्ये तिसऱ्या दिवशी (दि. ७ एप्रिल) सायंकाळच्या सत्रात माती गटात झालेल्या लढतीती धक्कादायक निकाल लागले. यामध्ये सोलापूरचा महाराष्ट्र केसरी बाला रफी याला पराभवाचा धक्का बसला. एकतर्फी झालेल्या लढतीत पैलवान विशाल बनकर मुंबई याने १३-३ अशा गुणांनी मात केली. तर, गादी गटात गतवर्षीच्या विजेत्या महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर नाशिक विरुद्ध कोल्हापूरच्या संग्राम पाटील हा ८ विरुद्ध ७ अशा गुणाधिकक्याने मात केली.

विजांचा कडकडाट, अन प्रेक्षकांचा जल्लोष यामध्ये पंचाना निकाल नोंदवताना अडचणी येत होत्या यामुळे संयोजकांना प्रेक्षकांच्या उत्साहाला आवरते घालणे कठीण झाले. गुरुवारी माती अन गादी विभागात झालेल्या लढतीत बऱ्याच पैलवानांचा दमासास लागला.

धक्कादायक निकाल | विशाल बनकरची बाला रफिक शेख वर मात

एकलांगी कुंडीत, घुटना पट अशा विविध डावाचे चित्त थरारक दर्शन प्रेक्षकांना झाले. कुस्ती निकाली काढण्यासाठी लागणारे कसब मल्ल दाखवत होते पण बऱ्याच कुस्त्या तांत्रिक निकालावर काढाव्या लागल्या . दरम्यान पैलवानांना उष्म्यामुळे लवकर थकवा येत असल्याचे दिसून आले. ८७, ९२ आणि १२५ या तीन खुल्या वजनी गटात उपांत्य फेरी रात्री उशिरा रंगल्या.

अधिक वाचा

Maharashtra Kesari | ‘ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ चरित्र ग्रंथाच्या १५व्या आवृत्तीचे प्रकाशन

आजवर ‘या’ मल्लांनी जिंकलीये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा, पाहा संपूर्ण यादी

तब्बल ५९ वर्षांनी साताऱ्यात आजपासून रंगणार ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा’, ‘इतक्या’ मल्लांचा असणार सहभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---