---Advertisement---

MPL 2025: एमपीएल इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, विजय यांच्यासाठी सोपाच

On: गुरूवार, मे 29, 2025 7:49 PM
---Advertisement---

MPL 2025: अल्पावधीतच राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीगमध्ये मानाचे स्थान पटकावलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) स्पर्धेचा तिसरा हंगाम 4 जूनपासून खेळला जाईल. आत्तापर्यंत झालेल्या दोन हंगामात संघाने एक-एक सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आज आपण एमपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या तीन संघांबद्दल जाणून घेऊया. (Most Wins in mpl 2024)

एमपीएलच्या पहिल्या दोन हंगामात ज्या संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले तो संघ आहे रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets). अझीम काझी याच्या नेतृत्वातील रत्नागिरी संघाने दोन्ही वेळा विजेतेपद पटकावले. त्यांनी आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवले आहेत. रत्नागिरी संघाने दोन्ही हंगामात मिळून 19 सामने खेळले आहेत. त्यापैकी तब्बल 14 सामन्यात त्यांना विजय मिळवता आला. त्यांच्या विजयाची टक्केवारी 73 टक्के इतकी जबरदस्त दिसून येते.

एमपीएलच्या दोन्ही हंगामात मिळून सर्वाधिक सामने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स (PBG Kolhapur Tuskers) संघाने खेळले आहेत. पुनीत बालन यांच्या मालकीच्या तसेच भारतीय संघासाठी खेळलेल्या केदार जाधव व राहुल त्रिपाठी यांच्या नेतृत्वात खेळलेल्या या संघाने 20 सामन्यात सहभाग नोंदवला. यापैकी 11 सामने जिंकण्यात त्यांना यश आले. त्यांच्या विजयाची टक्केवारी 55 इतकी आहे. कोल्हापूर संघाची सर्वोत्तम कामगिरी एमपीएल 2023 चा अंतिम सामना खेळणे, ही दिसते.

एमपीएलच्या दोन्ही हंगामात ईगल नाशिक टायटन्स (Eagle Nashik Titans) संघ सातत्यापूर्ण कामगिरी करताना दिसला आहे. पहिल्या हंगामात राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वात खेळताना त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर स्पर्धा संपवली होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामात या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. नाशिक संघाने आतापर्यंत एमपीएलमध्ये 19 सामने खेळले आहेत. यामध्ये संघाने 10 सामन्यात विजय संपादन केले. त्यांच्या विजयाची टक्केवारी 52 टक्के इतकी आहे.

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एमसीए अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, या स्पर्धेला सुरुवात केली होती. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 4 जून ते 22 जून या काळात ही स्पर्धा होईल. JioHotstar ओटीपी प्लॅटफॉर्मवर हे सामने लाईव्ह स्ट्रीमिंग केले जातील. तसेच, Star Sports 2 टीव्ही चॅनेलवर घरबसल्या क्रिकेट चाहत्यांना हे थरारक सामने पाहता येतील. मागील दोन वर्षाप्रमाणे यंदाही चाहत्यांना कोणत्याही तिकिटाविना थेट स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहता येतील. (MPL 2025 Live Telecast On JioHotstar OTT And Star Sports 2 Tv Channel)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---