---Advertisement---

यंगस्टर अर्शिनचा शतकी धमाका! 13 षटकारांनी ठोकल्या 117 धावा, नाशिक 200 पार

---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) स्पर्धेत सोमवारी (19 जून) एक सामना खेळला गेला. पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स अशा खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाशिक संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 203 धावा केल्या. युवा सलामीवीर अर्शिन कुलकर्णी याने झळकावलेले तुफानी शतक नाशिकच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरूअसलेल्या या स्पर्धेत पुणेरी बाप्पा व ईगल नाशिक टायटन्स या दोन्ही संघांनी सलग दोन विजयासह आपली घौडदौड कायम राखली होती. त्यामुळे पुणे व नाशिक यांच्यातील चुरस हि केवळ अव्वल स्थानासाठीच नव्हे तर प्ले ऑफ मध्ये पहिले स्थान निश्चित करण्यासाठी पाहायला मिळाली.

स्पर्धेतील आजच्या सातव्या लढतीत पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पुणेरी बाप्पाच्या सचिन भोसलेने आपल्याच तिसऱ्या चेंडूवर नाशिकच्या हर्षद खडीवालेला जीवदान मिळाले. शॉर्ट कव्हरच्या दिशेने उडालेला झेल पुण्याच्या यश क्षीरसागरने सोडला. त्यानंतर हर्धद खडीवाले(3 धावा) व अर्शिन कुलकर्णी (नाबाद 20 धावा) यांनी थोडीशी सावध सुरुवात करताना 3.2 षटकात 24 धावा असा धावफलक होता. त्याचवेळी हर्षद खडीवाले चोरटी धाव घेत असताना पुण्याच्या हर्ष सांघवीने धावचीत केले व नाशिकला पहिला धक्का दिला

महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील खेळाडू अर्शिन कुलकर्णीने आपला गियर बदलत आक्रमक पवित्रा स्वीकारला. अर्शिन 37 चेंडूत 3 चौकार व 7 षटकाराच्या मदतीने नाबाद 72 धावांची तुफानी फलंदाजी करत असतानाच पुण्याच्या पवन शहाने त्याचा झेल सोडून जीवदान दिले व त्याला षटकारही मिळाला. त्यानंतर अर्शिनने रोहन दामलेच्या याच षटकात सलग तीन षटकार मारले व नाबाद 96 धावांवर पोहोचला. त्यानंतर अर्शिनने 46 चेंडूत नाबाद 100 धावा करून एमपीएलमधील यावर्षीचे सर्वात जलदगतीने शतक करण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. अर्शिन कुलकर्णी (117 धावा) व राहुल त्रिपाठी (नाबाद 31) या जोडीने 64 चेंडूत 131 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. अर्शिन 117 धावांवर खेळत असताना शुभम कोठारीच्या चेंडूवर यश क्षीरसागरने त्याचा झेल टिपला. त्यानंतर राहुल त्रिपाठी(41 धावा)बाद झाल्यावर नाशिक संघाचा डाव गडगडला. 19 व्या षटकात पियुष साळवीने केवळ 1 धाव दिली व षटकात तीन बळी टिपले व अक्षय काळोखे धावबाद झाला. त्यानंतर नाशिक संघाने अखेरच्या षटकात 8 धावा करत 200 चा टप्पा पार पडला.

(Maharashtra Premier League MPL 2023 Eagle Nashik Titans Arshin Kulkarni Hits Blitz Century Against Puneri Bappa)

महत्वाच्या बातम्या –
कमिन्सच्या घातक यॉर्करवर इंग्लिश फलंदाज फेल! बॅट-बॉलचा संपर्क होण्याआधीच उडाल्या दांड्या
“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---