मोठ्या प्रतीक्षेनंतर सुरू होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या फ्रॅंचाईजींचा लिलाव शनिवारी (3 जून) पार पडला. या लिलावाला इच्छुक संघमालकांचा व अनेक उद्योजकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सहा संघांच्या या फ्रॅंचाईजीसाठी तब्बल 57.80 कोटी रुपयांचा बोली लागल्या. देशांतर्गत क्रिकेटमधील कोणत्याही राज्य संघटनेच्या लीगमधील ही सर्वात मोठी रक्कम आहे.
पुणे येथे आयोजित झालेल्या या लिलावात 20 इच्छुकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेतील सर्वात महागडी बोली पुणे फ्रॅंचाईजीची गेली. प्रवीण मसाले यांनी तब्बल 14.8 कोटी रुपयांना हा संघ आपल्या नावे केला. पुणे स्थित उद्योजक पुनीत बालन यांनी कोल्हापूर फ्रॅंचाईजीसाठी 11 कोटी रुपये मोजले. ईगल इन्फ्रा यांनी नाशिक फ्रॅंचाईजी 9.10 कोटींना खरेदी केली. व्यंकटेश्वर हा ग्रुपने छत्रपती संभाजीनगर फ्रॅंचाईजीसाठी 8.70 कोटी, रत्नागिरी फ्रॅंचाईजीसाठी जेटसिंथेसिस इंडियाने 8.30 कोटी आणि सोलापूर फ्रॅंचाईजीसाठी कपिल सन्स यांनी 7 कोटी रुपये मोजले.
या लिलावानंतर प्रत्येक संघाला एक आयकॉन खेळाडू निवडण्याची मुभा होती. सर्वात मोठी बोली लावल्याने पुणे फ्रॅंचाईजीला पहिला खेळाडू निवडण्याचा मान मिळाला. त्यांनी ऋतुराज गायकवाड याला आपल्या संघात सामील करून घेतले. कोल्हापूर फ्रॅंचाईजीने केदार जाधव व नाशिक फ्रॅंचाईजीने राहुल त्रिपाठी या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंना आपल्या संघाचा भाग बनवले. छत्रपती संभाजीनगर फ्रॅंचाईजीने युवा अष्टपैलू राजवर्धन हंगरगेकर, रत्नागिरीने अष्टपैलू अझीम काझी व सोलापूर फ्रॅंचाईजीने युवा फिरकीपटू विकी ओस्तवाल यांच्यावर विश्वास दाखवला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सर्व संघमालकांचे आभार व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 6 जून रोजी पार पडेल. प्रत्येक संघाकडे 20 लाख रुपयांची पर्स असेल. प्रत्येक संघ कमीत कमी 16 खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेऊ शकतो. ही स्पर्धा 15 जूनपासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. (Maharashtra Premier League MPL Franchisee Sold In 57 Crore Ruturaj Gaikwad Play For Pune Kedar For Kolhapur)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट करणार भीमपराक्रम, विवियन रिचर्ड्स-सेहवागचा ‘हा’ विक्रम होणार उद्ध्वस्त!
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक