---Advertisement---

अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्र राज्याचे संघ जाहीर, सायली जाधव, विक्रम कदम करणार नेतृत्व

On: रविवार, ऑक्टोबर 15, 2023 3:57 PM
Rohit Sharma Babar Azam
---Advertisement---

मुंबई :- भारत सरकारच्या मान्यतेने व अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी संघटनेच्या विद्यमाने दिनांक १६ ते २० ऑक्टोंबर या कालावधीत कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे.नवी दिल्ली येथील त्यागराज क्रीडा संकुल येथे या स्पर्धा खेळविण्यात येतील. या स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याने आज आपले दोन्ही संघ जाहीर केले. यंदाच शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त केलेल्या सायली जाधव कडे महिलांचे, तर सांगलीच्या विक्रम कदम कडे पुरुषांच्या नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे.

निवडण्यात आलेले हे दोन्ही संघ चार दिवसाच्या सरावा नंतर दिनांक १४ ऑक्टोंबर रोजी सायं. ०५-१० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून राजधानी एक्स्प्रेसने स्पर्धेकरीता रवाना झाले. निवडण्यात आलेले हे दोन्ही संघ सचिवालय जिमखान्याच्या कबड्डी विभागाचे सचिव मारुती कवलदार यांनी एका पत्रकाद्वारे सर्व प्रसार माध्यमांना पाठविले आहे. निवडण्यात आलेले संघ खालील प्रमाणे. (Maharashtra state team announced for All India Civil Service Kabaddi Tournament, Saili Jadhav, Vikram Kadam will lead it)

महिला संघ :-१)सायली जाधव(संघनायिका), २)वैशाली खरमाळे, ३)कल्पिता शिंदे, ४)ज्योती राक्षे, ५)नुपूर पवार, ६)स्वाती काकडे, ७)जयश्री साठे, ८) रुजिना शेख, ९) प्रिती झगडे, १०)माधवी राऊत, ११)मनीषा जगताप, १२)उज्वला वाघमारे.

संघ प्रशिक्षक:- संतोष जाधव. व्यवस्थापक:- गणेश भोईर.

पुरुष संघ:- १)विक्रम कदम(संघनायक), २)महेश सावकारे, ३)संदीप इंदुलकर, ४)सूरज कांबळे, ५)गणेश वावरे, ६)अंकुश महाले, ७)मारुती पवार, ८)राहुल चव्हाण, ९)निवृत्ती जगताप, १०)सुरेंद्रसिंह मेहरा, ११)दिनेश नाडे, १२)गोरख पवार, १३)गणेश काळे.

संघ प्रशिक्षक :- आनंद हेगडे. व्यवस्थापक :- जयवंत शेट्टे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---