पुणे: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी) यांच्या वतीने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र राज्य 8वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटात निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात औरंगाबादच्या भूमिका वागळे हिने तर मुलांच्या गटात मुंबईच्या रियांश वेंकट या खेळाडूंनी आपली आघाडी कायम ठेवत विजेतेपद संपादन केले.
सिम्बायोसिस स्पोर्ट्स सेंटर, प्रभातरोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात नवव्या फेरीत मुंबईच्या रियांश वेंकट याने मुंबई उपनगराच्या विहान अग्रवालला बरोबरीत रोखले व 8.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.रियांश डीबीएस स्कुल येथे पहिल्या इयत्तेत शिकतो. रियांशचे हे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे. यापुर्वी त्याने मुंबई डिस्ट्रीक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर, मुंबईच्या निर्वाण शहाने औरंगाबादच्या श्रेयस नलावडेचा पराभव करून 8 गुणांसह दुसरा क्रमांक पटकावला.
मुलींच्या गटात औरंगाबादच्या भूमिका वागळे हिने एमसीडीसीए च्या अमया रॉयचा 8 गुणांसह पराभव करत अव्वल क्रमांक पटकावला. भूमिका केंद्रीय विद्यालत संघटन येथे पहिल्या हिल्या इयत्तेत शिकते.
मुले व मुलींच्या गटातील अव्वल दोन खेळाडू हे हरियाणा येथे होणाऱ्या 8 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत
स्पर्धेत एकूण दहा हजार रूपये, करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्त्रबुद्धे, पीडीसीसीचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल, डब्लूजीएम स्वाती घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे सहसचिव शेखर जोरी, बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, सिबायोसिस स्पोर्ट्स सेंटरचे डॉ.सतीश ठिगळे आदी मान्यवर उपस्थित होते. विनिता क्षोत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी काल नुकताच छत्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर अभिषेक केळकर याचा सत्कार करण्यात आला.
निकाल: नववी फेरी: 8 वर्षांखालील मुले:
विहान अग्रवाल(मुंबई उपनगर)(7.5गुण)बरोबरी वि.रियांश वेंकट(मुंबई)(8.5गुण);
श्रेयस नलावडे(औरंगाबाद)(7गुण)पराभूत वि.निर्वाण शहा(मुंबई)(8गुण);
अव्यय गर्ग(मुंबई)(6.5गुण)पराभूत वि.अविरत चौहान(पुणे)(7गुण);
चिराग लाहोटी(नागपूर)(7गुण)वि.वि.वरद पाटील(कोल्हापूर)(6गुण);
विभोर गर्ग(पुणे)(7गुण)वि.वि.विवान सोनी(कोल्हापूर)(6गुण);
आरव धूत(नागपूर)(7गुण)वि.वि.पर्व हकानी(मुंबई उपनगर)(6गुण);
आरिव कामत(पुणे)(7गुण)वि.वि.परम झाडे(अकोला)(6गुण);
विहान राव(मुंबई शहर)(7गुण)वि.वि.अवी चुग(मुंबई)(6गुण)
अर्जुन सिंग(मुंबई उपनगर)(6.5गुण)वि.वि.हितांश गोहिल(मुंबई)(5.5गुण);
8वर्षांखालील मुली: आठवी फेरी:
अमया रॉय(एमसीडीसीए)(5गुण) पराभूत वि.भूमिका वागळे(औरंगाबाद)(8गुण);
इरा बोहरा(पुणे)(6.5गुण)वि.वि.त्वेशा जैन(6गुण);
भक्ती गवळी(औरंगाबाद)(6गुण)वि.वि.स्वरा गांधी(नागपुर)(5.5गुण);
देवांश्री गावंडे(औरंगाबाद)(5गुण)पराभूत वि.आरोही पाटील(रायगड)(6गुण);
रेवा चरणकर(सातारा)(5गुण)पराभूत वि.आदिती हेलवाडे(पुणे)(6गुण);
विश्वजा देशमुख()(5गुण) पराभूत वि.पेहेल गाडा(मुंबई)(6गुण);
सान्वी येवलेकर(मुंबई उपनगर)(5गुण)पराभूत वि.आस्था सुरकर(वर्धा)(6गुण);
मिहिका बोले(पुणे)(4.5गुण) पराभूत वि.जियाना गाडा(मुंबई दक्षिण)(5.5गुण).