---Advertisement---

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांची अंतिम फेरीत धडक.

On: गुरूवार, जानेवारी 24, 2019 11:16 AM
---Advertisement---

बिहार राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने पाटलीपुत्र क्रीडा संकुल, पटणा- बिहार येथे सुरू असलेल्या ३० व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय स्पर्धेला आज सकाळी उपांत्य फेरीचे सामने पार पडले.

महाराष्ट्र किशोर गट मुलाचा उपांत्य फेरीचा सामना कर्नाटका विरुद्ध झाला. महाराष्ट्राच्या मुलांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत जोरदार सुरुवात केली. मध्यंतरापर्यत १५-०८ अशी महाराष्ट्रांकडे आघाडी होती.

मध्यंतरानंतर महाराष्ट्र संघाने कर्नाटकावर लोन करत सामन्यावर पकड मजबूत केली. महाराष्ट्र संघा विरुद्ध कर्नाटक संघाला काहीच प्रतिकार करता आला नाही. महाराष्ट्राच्या मुलांनी ४३-१६ असा सहज विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अमरसिंह कश्यप, राहुल वाघमारे, पियुष पाटील यांनी विजयात मोलाची भूमिका निभावली. अंतिम फेरीत महाराष्ट्र विरुद्ध बिहार किंवा हरियाणा यांच्यात होईल. बिहार विरुद्ध हरियाणा यांच्यात दुसरा उपांत्य सामना सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment