जयपूर, ८ मे २०२३: आजपासून सुरू झालेल्या प्रीमिअर हँडबॉल लीग स्पर्धेत महाराष्ट्र आयर्नमॅन संघाचा पहिल्याच सामन्यात जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. राजस्थान पॅट्रियट्सविरुद्धच्या या सामन्यात महाराष्ट्र आयर्नमॅन संघाने शेवटपर्यंत कडवी टक्कर दिली, परंतु त्यांचा २८–२७ असा पराभव झाला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर ही लीग होत आहे.
पुनित बालन यांच्या मालकीच्या संघाने सामन्याची जोरदार सुरुवात केली आणि 52 शॉट्स घेत कोर्टवर सकारात्मक दृष्टिकोन दाखवल्याने शेवटच्या क्षणापर्यंत खेळ जिवंत ठेवला. आता त्यांचा पुढील सामना शनिवारी गोल्डन ईगल्स यूपीशी होणार आहे. स्पर्धेतील पहिला विजय नोंदवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एमपीएलमधील छत्रपती संभाजी किंग्ज फ्रेंचाईजी धनंजय मुंडेंकडे! खेळाडूंसोबत स्वतःही केला क्रिकेटचा सराव
अर्रर्र! गिल भाऊंचा अंदाज चुकला अन् बोलँडच्या भेदक चेंडूने केल्या दांड्या गुल, व्हिडिओ पाहाच